S M L

निकृष्ट कामामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण

21 जुलैविकासाचे रोल मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते. मात्र महापालिकेकडून शहरात केला जाणारा शहरातील विकास फक्त कागदावरच दिसतोय. गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील सगळ्याच मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळणी केली. तब्बल 45 कोटी रुपये खर्च करुन शहरातील रस्ते विकसित करण्यात आले. पण निकृष्ट कामामुळे पिंपरी-चिंचवडच्या रस्त्याची काय दुर्दशा झाली. काळेवाडी, कस्पटेवस्ती, चाफेकर, चौक, पिंपरी आणि चिंचवड गावठाणातील मुख्य रस्त्यांची ही दृश्यं आहेत. या खड्‌ड्यांमुळे वाहतुकीला तर अडथळा होतच आहे. पण वाहनांच्या दुरूस्तीचाही भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतोय. तसेच खड्‌ड्यात साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. पण पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणं नेहमीचंच असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 10:26 AM IST

निकृष्ट कामामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण

21 जुलै

विकासाचे रोल मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते. मात्र महापालिकेकडून शहरात केला जाणारा शहरातील विकास फक्त कागदावरच दिसतोय. गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील सगळ्याच मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळणी केली. तब्बल 45 कोटी रुपये खर्च करुन शहरातील रस्ते विकसित करण्यात आले.

पण निकृष्ट कामामुळे पिंपरी-चिंचवडच्या रस्त्याची काय दुर्दशा झाली. काळेवाडी, कस्पटेवस्ती, चाफेकर, चौक, पिंपरी आणि चिंचवड गावठाणातील मुख्य रस्त्यांची ही दृश्यं आहेत. या खड्‌ड्यांमुळे वाहतुकीला तर अडथळा होतच आहे. पण वाहनांच्या दुरूस्तीचाही भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतोय. तसेच खड्‌ड्यात साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. पण पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणं नेहमीचंच असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर योगेश बहल यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close