S M L

छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात

14 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 39 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली. तर दुसर्‍या टप्प्यात 20 नोव्हेंबरला उरलेल्या 51 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सुरूवात झाली आहे. दरम्यान दंतेवाडामध्ये निवडणुकीचं काम करण्यास नकार देणार्‍या काही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. एकूण 90 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी 39 जागा राखीव आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबरला होईल. सध्या छत्तीसगड विधानसभेत भाजपच्या एकूण 50 जागा आहेत. तर काँग्रेस 37 जागांसहित प्रमुख विरोधी पक्ष आहे. बसपाच्या दोन जागा आहेत. तर राष्ट्रवादीची 1 जागा आहे. यामध्ये छत्तीसगढचे सध्याचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या मतदारसंघातही आज मतदान होत आहे. त्यांच्याविरूद्ध राजनंदगांव या मतदारसंघात उदय मुदलियांर हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. छत्तीसगढ विधानसभेचे सभापती भाजपचे प्रेमप्रकाश पांडे यांच्याविरोधात काँग्रेसचे बद्‌द्रुद्दीन कुरेशी यांची लढत होतेय. तर सध्याचे विरोधी पक्ष नेते महेंद्र कर्मा यांच्याविरोधात भाजपचे भिमराज संडावी उभे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 06:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 06:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close