S M L

मोदींचे कौतुक करणारे दारुल उलूमचे कुलगुरू निलंबित

24 जुलैदारुल उलूम देवबंद विद्यापीठाचे कुलगुरू गुलाम वस्तानवी यांना अखेर निरोपाचा नारळ देण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची फेब्रुवारी महिन्यात स्तुती केल्याप्रकरणी अडचणीत आले होते. मजलीस ए शूराच्या आज झालेल्या बैठकीत वस्तानवी यांना पदावरुन काढण्यात आलं. त्यांच्याविरोधात शूराच्या आठ सदस्यांनी मतदान केलं. आपल्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना वस्तानवी यांनी सांगितले की आपल्या बाजूने पाच जणांनी मत दिलं आणि चौकशी समितीला सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याने मला तो मान्य नाही. तसेच विद्यार्थी माझ्या बाजूने असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 11:09 AM IST

मोदींचे कौतुक करणारे दारुल उलूमचे कुलगुरू निलंबित

24 जुलै

दारुल उलूम देवबंद विद्यापीठाचे कुलगुरू गुलाम वस्तानवी यांना अखेर निरोपाचा नारळ देण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची फेब्रुवारी महिन्यात स्तुती केल्याप्रकरणी अडचणीत आले होते. मजलीस ए शूराच्या आज झालेल्या बैठकीत वस्तानवी यांना पदावरुन काढण्यात आलं. त्यांच्याविरोधात शूराच्या आठ सदस्यांनी मतदान केलं. आपल्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना वस्तानवी यांनी सांगितले की आपल्या बाजूने पाच जणांनी मत दिलं आणि चौकशी समितीला सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याने मला तो मान्य नाही. तसेच विद्यार्थी माझ्या बाजूने असल्याचंही त्यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close