S M L

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

24 जुलैपावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याची तयारी सर्व विरोधी पक्षांनी चालवली आहे. सरकारला कोणत्या मुद्द्यांवर कोंडीत पकडून अडचणीत आणता येईल याचीच रणनिती ठरवण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या घरी बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शिवसेना - भाजपसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्षही या बैठकीत सहभागी होते. 13/7 च्या बॉम्बस्फोटामुळे उघडकीस आलेल्या सुरक्षायंत्रणेतील त्रुटींबरोबरच राज्यात गाजणार्‍या अनेक घोटाळ्यांप्रश्नी सरकार अडचणीत येऊ शकतं.या अधिवेशनात विरोधकांचे मुद्दे - ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था- दुष्काळ, अतिवृष्टीबरोबरच खतं आणि बियाणांची टंचाई, बोगस बी-बियाणं- गिरणी कामगारांसाठीची मोफत घरकुल योजना- शिक्षण क्षेत्रामधील घोळ, सिंहगड इन्स्टिट्यूटसारख्या अनेक संस्थांमधील गैर कारभार- एसआरए, लवासा सारखे अनेक जमीन घोटाळे- जैतापूरमध्ये सरकारने केलेली कारवाई- स्त्री भ्रूण हत्या आणि यासंबंधात हतबल झालेलं, कुठल्याही प्रभावी उपाययोजना करू न शकलेलं सरकार

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 12:47 PM IST

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

24 जुलै

पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवर घेरायचं याची तयारी सर्व विरोधी पक्षांनी चालवली आहे. सरकारला कोणत्या मुद्द्यांवर कोंडीत पकडून अडचणीत आणता येईल याचीच रणनिती ठरवण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या घरी बैठक पार पडली.

या बैठकीत विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शिवसेना - भाजपसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्षही या बैठकीत सहभागी होते. 13/7 च्या बॉम्बस्फोटामुळे उघडकीस आलेल्या सुरक्षायंत्रणेतील त्रुटींबरोबरच राज्यात गाजणार्‍या अनेक घोटाळ्यांप्रश्नी सरकार अडचणीत येऊ शकतं.

या अधिवेशनात विरोधकांचे मुद्दे

- ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था- दुष्काळ, अतिवृष्टीबरोबरच खतं आणि बियाणांची टंचाई, बोगस बी-बियाणं- गिरणी कामगारांसाठीची मोफत घरकुल योजना- शिक्षण क्षेत्रामधील घोळ, सिंहगड इन्स्टिट्यूटसारख्या अनेक संस्थांमधील गैर कारभार- एसआरए, लवासा सारखे अनेक जमीन घोटाळे- जैतापूरमध्ये सरकारने केलेली कारवाई- स्त्री भ्रूण हत्या आणि यासंबंधात हतबल झालेलं, कुठल्याही प्रभावी उपाययोजना करू न शकलेलं सरकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close