S M L

कंटेनरने वारकर्‍यांना चिरडले ; 14 ठार

25 जुलैशेकडो किलोमीटरच अंतर पायी पार करून विठूरायाचे दर्शन घेऊन निघालेल्या वारकर्‍यांवर काळाने झडप घातली. जालन्याजवळ अंबड - बीड रस्ताच्याकडेला थांबलेल्या वारकर्‍यांना भरधाव वेगात जाणार्‍या कंटनेरने चिरडले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी आहे. जखमींना जालना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.पंढरपुरात विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर असलेली दिंडी जालन्याजवळ अंबड - बीड रोडच्या कडेला काही वेळासाठी थांबली होती. दिंडीत 400 ते 500 वारकरी सहभागी होते. यावेळी बीडहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणार HR 38 N 7349 क्रमांकाचा कंटेनर दिंडीत घुसला. वारकर्‍यांना चिरडत कंटेनर पुढे सरकला. या धडकेत 14 वारकरी जागेवरच ठार झाले. यानंतरही कंटेनर थांबला नाही तो पुढे जाऊन काही वाहनांनाही धडकला. आणि जालन्याच्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करून काही अंतरावर अडवला. संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर पेटवून दिला. तसेच कंटेनर चालकाला पोलिसांच्या हवाली केला. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 14 वारकर्‍यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली. आणि संतप्त नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी जमा झाली. संतप्त जमावाने पोलिसांच्या आणि जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभा असलेला एक ट्रक पेटवून दिला. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र या लाठीचार्जमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 10 वाहनं फोडण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 03:51 PM IST

कंटेनरने वारकर्‍यांना चिरडले ; 14 ठार

25 जुलै

शेकडो किलोमीटरच अंतर पायी पार करून विठूरायाचे दर्शन घेऊन निघालेल्या वारकर्‍यांवर काळाने झडप घातली. जालन्याजवळ अंबड - बीड रस्ताच्याकडेला थांबलेल्या वारकर्‍यांना भरधाव वेगात जाणार्‍या कंटनेरने चिरडले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी आहे. जखमींना जालना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंढरपुरात विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर असलेली दिंडी जालन्याजवळ अंबड - बीड रोडच्या कडेला काही वेळासाठी थांबली होती. दिंडीत 400 ते 500 वारकरी सहभागी होते. यावेळी बीडहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणार HR 38 N 7349 क्रमांकाचा कंटेनर दिंडीत घुसला. वारकर्‍यांना चिरडत कंटेनर पुढे सरकला. या धडकेत 14 वारकरी जागेवरच ठार झाले. यानंतरही कंटेनर थांबला नाही तो पुढे जाऊन काही वाहनांनाही धडकला. आणि जालन्याच्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करून काही अंतरावर अडवला. संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर पेटवून दिला. तसेच कंटेनर चालकाला पोलिसांच्या हवाली केला. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 14 वारकर्‍यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली. आणि संतप्त नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी जमा झाली.

संतप्त जमावाने पोलिसांच्या आणि जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभा असलेला एक ट्रक पेटवून दिला. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र या लाठीचार्जमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 10 वाहनं फोडण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close