S M L

राजीनामा देणार नाही - येडियुरप्पा

24 जुलैमायनिंग घोटाळ्याप्रकरणी राजीनामा देणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. येडियुरप्पा यांच्यावर कारवाई करावी अशी पक्षातल्याच काही लोकांची मागणी आहे. पण आपण अजून दोन वर्षं मुख्यमंत्रीपदावर राहणार असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. लोकायुक्त संतोष हेगडे यांनी येडियुरप्पा यांच्या कुटुंबीयांचे मायनिंग माफियांशी संबंध असल्याचा आरोप आपल्या अहवालात केला. तो अहवाल अजून राज्यपालांकडे सादर व्हायचा आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. कुटुंबीयांसोबत मॉरिशसला सुट्टी घालवल्यानंतर आज ते बंगळुरूत परतले. त्यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलंय आणि आपल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वेंकय्या नायडू, अनंत कुमार आणि धर्मेंद्र प्रधान यांची समिती नेमावी, अशी मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 04:52 PM IST

राजीनामा देणार नाही - येडियुरप्पा

24 जुलै

मायनिंग घोटाळ्याप्रकरणी राजीनामा देणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. येडियुरप्पा यांच्यावर कारवाई करावी अशी पक्षातल्याच काही लोकांची मागणी आहे. पण आपण अजून दोन वर्षं मुख्यमंत्रीपदावर राहणार असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

लोकायुक्त संतोष हेगडे यांनी येडियुरप्पा यांच्या कुटुंबीयांचे मायनिंग माफियांशी संबंध असल्याचा आरोप आपल्या अहवालात केला. तो अहवाल अजून राज्यपालांकडे सादर व्हायचा आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. कुटुंबीयांसोबत मॉरिशसला सुट्टी घालवल्यानंतर आज ते बंगळुरूत परतले.

त्यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलंय आणि आपल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वेंकय्या नायडू, अनंत कुमार आणि धर्मेंद्र प्रधान यांची समिती नेमावी, अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close