S M L

संतापाचा उद्रेक ; अपघातानंतर लाठीचार्जमध्ये 2 जणांचा मृत्यू

25 जुलैजालन्याजवळ अंबड - बीड रस्ताच्याकडेला थांबलेल्या वारकर्‍यांना भरधाव वेगात जाणार्‍या कंटनेरने चिरडले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी आहे. यानंतर संतापाचा उद्रेक झाला. संतप्त लोकांनी गाड्यांची जाळपोळ करत एक कंटेनर, ट्रकही पेटवला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पण यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पण या लाठीचार्जमध्ये दोघांचा मृत्यू झाला.पंढरपुरात विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर असलेली दिंडी जालन्याजवळ अंबड - बीड रोडच्या कडेला काही वेळासाठी थांबली होती. दिंडीत 400 ते 500 वारकरी सहभागी होते. यावेळी बीडहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणार HR 38 N 7349 क्रमांकाचा कंटेनर दिंडीत घुसला. वारकर्‍यांना चिरडत कंटेनर पुढे सरकला. या धडकेत 14 वारकरी जागेवरच ठार झाले. यानंतरही कंटेनर थांबला नाही तो पुढे जाऊन काही वाहनांनाही धडकला. आणि जालन्याच्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करून काही अंतरावर अडवला. संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर पेटवून दिला. तसेच कंटेनर चालकाला पोलिसांच्या हवाली केला. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 14 वारकर्‍यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली. आणि संतप्त नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी जमा झाली. संतप्त जमावाने पोलिसांच्या आणि जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभा असलेला एक ट्रक पेटवून दिला. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र या लाठीचार्जमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 06:03 PM IST

संतापाचा उद्रेक ; अपघातानंतर लाठीचार्जमध्ये 2 जणांचा मृत्यू

25 जुलै

जालन्याजवळ अंबड - बीड रस्ताच्याकडेला थांबलेल्या वारकर्‍यांना भरधाव वेगात जाणार्‍या कंटनेरने चिरडले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी आहे. यानंतर संतापाचा उद्रेक झाला. संतप्त लोकांनी गाड्यांची जाळपोळ करत एक कंटेनर, ट्रकही पेटवला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पण यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पण या लाठीचार्जमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

पंढरपुरात विठूरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर असलेली दिंडी जालन्याजवळ अंबड - बीड रोडच्या कडेला काही वेळासाठी थांबली होती. दिंडीत 400 ते 500 वारकरी सहभागी होते. यावेळी बीडहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणार HR 38 N 7349 क्रमांकाचा कंटेनर दिंडीत घुसला. वारकर्‍यांना चिरडत कंटेनर पुढे सरकला. या धडकेत 14 वारकरी जागेवरच ठार झाले.

यानंतरही कंटेनर थांबला नाही तो पुढे जाऊन काही वाहनांनाही धडकला. आणि जालन्याच्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग करून काही अंतरावर अडवला. संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर पेटवून दिला. तसेच कंटेनर चालकाला पोलिसांच्या हवाली केला. घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 14 वारकर्‍यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली. आणि संतप्त नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी जमा झाली. संतप्त जमावाने पोलिसांच्या आणि जिल्हाधिकार्‍यांच्या वाहनांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभा असलेला एक ट्रक पेटवून दिला. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र या लाठीचार्जमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close