S M L

राज्यभरात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचं पीक

26 जुलैराज्यभर सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा घोटाळा गाजतोय. यासाठी सरकारी कंपनी महाबीजसकट 25 बियाणं कंपन्या जबाबदार आहेत. या बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतक•यांच्या इतक्या तक्रारी येऊनही एकाही कंपनीवर सरकारनं कारवाई केलेली नाही. राज्यभरात सोयाबीनचं जवळपास 15 हजार हेक्टर क्षेेत्र करपलंय. या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या सोयाबीन बियाणं घोटाळयाचा पर्दाफाश करणारी कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीयत. त्यानुसार राज्यातल्या 115 तालुक्यांमध्ये सोयाबिनच्या बियाण्यांबाबत 11 हजार 111 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार सोयाबीनचं 14 हजार 900 हेक्टर क्षेत्र करपलंय. यापैकी जवळपास 11 हजार क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2011 01:49 PM IST

राज्यभरात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचं पीक

26 जुलै

राज्यभर सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा घोटाळा गाजतोय. यासाठी सरकारी कंपनी महाबीजसकट 25 बियाणं कंपन्या जबाबदार आहेत. या बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतक•यांच्या इतक्या तक्रारी येऊनही एकाही कंपनीवर सरकारनं कारवाई केलेली नाही. राज्यभरात सोयाबीनचं जवळपास 15 हजार हेक्टर क्षेेत्र करपलंय. या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या सोयाबीन बियाणं घोटाळयाचा पर्दाफाश करणारी कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीयत. त्यानुसार राज्यातल्या 115 तालुक्यांमध्ये सोयाबिनच्या बियाण्यांबाबत 11 हजार 111 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार सोयाबीनचं 14 हजार 900 हेक्टर क्षेत्र करपलंय. यापैकी जवळपास 11 हजार क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2011 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close