S M L

मुंबई बॉम्बस्फोट : नेपाळमधून संशयित ताब्यात

26 जुलैमुंबईत 13 जुलैला झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या तपासात नेपाळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. मोहम्मद झहीर असं या व्यक्तीचं नाव आहे. झहीर हा बॉम्बस्फोटातल्या आरोपींंच्या संपर्कात होता अशी माहिती मिळतेय. चाळीस वर्षांच्या मोहम्मद झहिर याला नेपाळची राजधानी काठमांडूमधून अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या अपार्टमेंटमधून झहिला ताब्यात घेण्यात आलं ते अपार्टमेंट नेपाळच्या पंतप्रधानांच्या घराच्या अगदी जवळ आहे. तो मूळचा सरलाही या भारताच्या सीमेलगतच्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. नेपाळ पोलिसांच्या एंटी टेरेरिझम सेलनं ही कारवाई केली. मुंबईतल्या बॉम्बस्फोटमधलं संभाषण मोहम्मद झहीर त्याच्या फोनवरून ऐकत होता. आणि त्याच नंबर्सवर जहीर मेसेजेसही पाठवायचा अशी माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली होती. त्याआधारे मोहम्मद जहीर याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2011 02:40 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : नेपाळमधून संशयित ताब्यात

26 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या तपासात नेपाळ पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. मोहम्मद झहीर असं या व्यक्तीचं नाव आहे. झहीर हा बॉम्बस्फोटातल्या आरोपींंच्या संपर्कात होता अशी माहिती मिळतेय. चाळीस वर्षांच्या मोहम्मद झहिर याला नेपाळची राजधानी काठमांडूमधून अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या अपार्टमेंटमधून झहिला ताब्यात घेण्यात आलं ते अपार्टमेंट नेपाळच्या पंतप्रधानांच्या घराच्या अगदी जवळ आहे. तो मूळचा सरलाही या भारताच्या सीमेलगतच्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. नेपाळ पोलिसांच्या एंटी टेरेरिझम सेलनं ही कारवाई केली. मुंबईतल्या बॉम्बस्फोटमधलं संभाषण मोहम्मद झहीर त्याच्या फोनवरून ऐकत होता. आणि त्याच नंबर्सवर जहीर मेसेजेसही पाठवायचा अशी माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली होती. त्याआधारे मोहम्मद जहीर याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close