S M L

सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे हजारो हेक्टर पिकं करपली

27 जुलैराज्यभरामध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा घोटाळा गाजत आहेत. यासाठी सरकारी कंपनी महाबीजसकट 24 बियाणं कंपन्या जबाबदार आहेत. या बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतकर्‍यांच्या इतक्या तक्रारी येऊनही एकाही कंपनीवर सरकारने कारवाई केलेली नाही. राज्यभरात सोयाबीनचे जवळपास 15 हजार हेक्टर क्षेत्र करपलं आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या सोयाबीन बियाणं घोटाळयाचा पर्दाफाश करणारी कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागली. त्यानुसार राज्यातल्या 115 तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांबाबत 11 हजार 811 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार सोयाबीनचं 14 हजार 900 हेक्टर क्षेत्र करपलंय. यापैकी जवळपास 11 हजार क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागली आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या घोटाळ्यासाठी महाबीज ही सरकारी कंपनीच जबाबदार आहे. तसेच महाबीजबरोबरच अजित, राबिनी, निर्मल सीड्स, बसंत ऍग्रोटेक, कोहीनूर, यशोदा हायबर्ड, कृषीधन, ग्रीनगोल्ड, पाटीदार, अंकुर, व्हजिर्न, सेठी, मारुती, इगल, लोकमंगल, ओसवाल, ममता, महंत, अभिनव, रवी, सिद्धासीड्स, सागर, त्रिशूल, सोयम अशा 24 बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या आहेत.विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीनमुळे जवळपास 260 हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीनच्या शेतकर्‍यांच नुकसान झालेलं असताना सरकारने मात्र 785 हेक्टरसाठी पर्यायी बियाणं मिळवून दिलं. तर कोट्यवधींचं नुकसान झालेलं असताना 25 लाख 50 हजार रुपयांती भरपाई देण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकूण 5 हजार 733 तक्रारी आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातीलं 6,593 हेक्टर क्षेत्र करपलं. या क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली. नांदेडपाठोपाठ लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधींच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 09:16 AM IST

सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे हजारो हेक्टर पिकं करपली

27 जुलै

राज्यभरामध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा घोटाळा गाजत आहेत. यासाठी सरकारी कंपनी महाबीजसकट 24 बियाणं कंपन्या जबाबदार आहेत. या बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतकर्‍यांच्या इतक्या तक्रारी येऊनही एकाही कंपनीवर सरकारने कारवाई केलेली नाही. राज्यभरात सोयाबीनचे जवळपास 15 हजार हेक्टर क्षेत्र करपलं आहे.

या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या सोयाबीन बियाणं घोटाळयाचा पर्दाफाश करणारी कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागली. त्यानुसार राज्यातल्या 115 तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांबाबत 11 हजार 811 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार सोयाबीनचं 14 हजार 900 हेक्टर क्षेत्र करपलंय. यापैकी जवळपास 11 हजार क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागली आहेत.

सोयाबीन बियाण्यांच्या घोटाळ्यासाठी महाबीज ही सरकारी कंपनीच जबाबदार आहे. तसेच महाबीजबरोबरच अजित, राबिनी, निर्मल सीड्स, बसंत ऍग्रोटेक, कोहीनूर, यशोदा हायबर्ड, कृषीधन, ग्रीनगोल्ड, पाटीदार, अंकुर, व्हजिर्न, सेठी, मारुती, इगल, लोकमंगल, ओसवाल, ममता, महंत, अभिनव, रवी, सिद्धासीड्स, सागर, त्रिशूल, सोयम अशा 24 बियाणं कंपन्यांच्या विरोधात शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या आहेत.

विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीनमुळे जवळपास 260 हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीनच्या शेतकर्‍यांच नुकसान झालेलं असताना सरकारने मात्र 785 हेक्टरसाठी पर्यायी बियाणं मिळवून दिलं. तर कोट्यवधींचं नुकसान झालेलं असताना 25 लाख 50 हजार रुपयांती भरपाई देण्यात आली.

यामध्ये नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकूण 5 हजार 733 तक्रारी आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातीलं 6,593 हेक्टर क्षेत्र करपलं. या क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली. नांदेडपाठोपाठ लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती आहे.त्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधींच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close