S M L

'एसएमएस'व्दारे गुन्हेगारीला आळा ; 234 गुन्हेगार गजाआड

गोविंद वाकडे, मुंबई27 जुलैपोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जायचं म्हटलं की सामान्य माणसं कचरतात कारण त्यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक. पण आपल्या परिसरात गैरप्रकार सुरू असल्याचा एक एसएमएस लोक करतात तो पोलिसांकडून वाचला जातो आणि त्याच्यावर धडक कारवाईसुद्धा होते. पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या या प्रयोगामुळे चार दिवसात 250 पेक्षा जास्त अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली.तर तब्बल 234 गुन्हेगारांना गजाआड केलं आहे. पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी लोकांना आपल्या आसपासच्या परिसरात होणार्‍या गुन्हेगारीची माहिती आपण एसएमएस करून पाठवू शकता यावर पोलीस नक्कीच कारवाई करेल. असं नागरिकांना आवाहन केलं. आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत अनेक अवैध धंद्यांची माहिती एसएमएसच्या माध्यमातून पोलिसांना दिली. आणि या कारवाईत उघड झाला इंदापूर इथं सुरू असलेला एलपीजी गॅसचा काळा बाजार. पुण्याच्या ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. चारच दिवसात 250 पेक्षा जास्त अवैध धंदे आणि 233 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलीपोलिसांच्या या नवीन प्रयोगाचं नागरिकांनीही जोरदार स्वागत केलं. कर्णिक यांच्या मोबाईलवर रोज 100 एसएमएस तरी येतात. यात लँडमाफियांविरोधात सर्वाधिक तक्रारी येत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीवर जमिनीच्या गैरव्यवहाराचे दोन पेक्षा अधिक गुन्हा दाखल असतील त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही कर्णिक यांनी दिला. आता राज्यातील इतर पोलिसांनीही पुणे ग्रामीण पोलिसांचा एसएमएस पॅटर्न राबवण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 01:18 PM IST

'एसएमएस'व्दारे गुन्हेगारीला आळा ; 234 गुन्हेगार गजाआड

गोविंद वाकडे, मुंबई

27 जुलै

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जायचं म्हटलं की सामान्य माणसं कचरतात कारण त्यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक. पण आपल्या परिसरात गैरप्रकार सुरू असल्याचा एक एसएमएस लोक करतात तो पोलिसांकडून वाचला जातो आणि त्याच्यावर धडक कारवाईसुद्धा होते.

पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या या प्रयोगामुळे चार दिवसात 250 पेक्षा जास्त अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली.तर तब्बल 234 गुन्हेगारांना गजाआड केलं आहे. पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांनी लोकांना आपल्या आसपासच्या परिसरात होणार्‍या गुन्हेगारीची माहिती आपण एसएमएस करून पाठवू शकता यावर पोलीस नक्कीच कारवाई करेल. असं नागरिकांना आवाहन केलं. आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत अनेक अवैध धंद्यांची माहिती एसएमएसच्या माध्यमातून पोलिसांना दिली.

आणि या कारवाईत उघड झाला इंदापूर इथं सुरू असलेला एलपीजी गॅसचा काळा बाजार. पुण्याच्या ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. चारच दिवसात 250 पेक्षा जास्त अवैध धंदे आणि 233 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली

पोलिसांच्या या नवीन प्रयोगाचं नागरिकांनीही जोरदार स्वागत केलं. कर्णिक यांच्या मोबाईलवर रोज 100 एसएमएस तरी येतात. यात लँडमाफियांविरोधात सर्वाधिक तक्रारी येत आहे.

त्यामुळे ज्या व्यक्तीवर जमिनीच्या गैरव्यवहाराचे दोन पेक्षा अधिक गुन्हा दाखल असतील त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही कर्णिक यांनी दिला. आता राज्यातील इतर पोलिसांनीही पुणे ग्रामीण पोलिसांचा एसएमएस पॅटर्न राबवण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close