S M L

युवराजच्या सेंच्युरीनंतर, इंग्लंडची डळमळीत सुरुवात

14 नोव्हेंबर राजकोटराजकोट वन डे मध्ये युवराजच्या धडाकेबाज सेंच्युरीनंतर इंग्लंडची डळमळीत सुरुवात झाली आहे. आत्तापर्यत इंग्लंडच्या सात विकेटवर 169 रन्स झाले आहेत. भारत इंग्लंड वन डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडसमोर 387 रन्सचा डोंगर उभा केला. त्यात सिंहाचा वाटा उचलला तो भारताचा डावखुरा स्टार बॅटसमन युवराज सिंगनं. सीरिजच्या या पहिल्याच मॅचमध्ये पाहुण्यांना जबरदस्त दणका देत युवराजनं फोर आणि सिक्सची आतषबाजी करत दमदार सेंच्युरी ठोकली. पाठीच्या दुखापतीनं युवराज त्रस्त तरीही त्याने आपल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. युवराजनं फक्त 78 बॉल्समध्ये 6 सिक्स आणि 16 फोर ठोकत नाबाद 138 रन्स केले. मॅट प्रायर आणि ओवेस शाह हे त्यांचे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. कॅप्टन केविन पीटरसनचा अपवाद वगळता त्यांचे इतर बॅट्समन मैदानावर फक्त हजेरी लावून परतले. पीटरसनही 63 रन्सवर आउट झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 10:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close