S M L

2 जी च्या धोरणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार - बेहुरिया

27 जुलै2 जी घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांच्यानंतर माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरिया यांची आज स्पेशल सीबीआय कोर्टात साक्ष झाली. राजा यांच्याप्रमाणेच त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळावर तोफ डागली. 2 जी स्पेक्ट्रमच्या धोरणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला. आपण केवळ एक सरकारी नोकर आहोत. सरकारच्या धोरणाचे आपण फक्त पालन केले. पण, आता आपल्याला बळीचा बकरा बनवलं जातंय असं ते म्हणाले. बेहुरिया यांनी राजा यांच्या वकिलांप्रमाणे थेट न्यायाधीशांवरच हल्ला चढवला. धोरणात्मक निर्णयांचे विश्लेषण करायला हे कोर्ट असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटलं. 2 जी स्पेक्ट्रम लायसन्ससाठी ठेवलेल्या प्रवेश फीच्या कागदपत्रांवर तेव्हाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीच सही केली होती असं बेहुरिया यांचे वकील अमन लेखी यांनी कोर्टात सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 04:40 PM IST

2 जी च्या धोरणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार - बेहुरिया

27 जुलै

2 जी घोटाळ्याप्रकरणी ए राजा यांच्यानंतर माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरिया यांची आज स्पेशल सीबीआय कोर्टात साक्ष झाली. राजा यांच्याप्रमाणेच त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळावर तोफ डागली. 2 जी स्पेक्ट्रमच्या धोरणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला. आपण केवळ एक सरकारी नोकर आहोत.

सरकारच्या धोरणाचे आपण फक्त पालन केले. पण, आता आपल्याला बळीचा बकरा बनवलं जातंय असं ते म्हणाले. बेहुरिया यांनी राजा यांच्या वकिलांप्रमाणे थेट न्यायाधीशांवरच हल्ला चढवला. धोरणात्मक निर्णयांचे विश्लेषण करायला हे कोर्ट असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटलं. 2 जी स्पेक्ट्रम लायसन्ससाठी ठेवलेल्या प्रवेश फीच्या कागदपत्रांवर तेव्हाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीच सही केली होती असं बेहुरिया यांचे वकील अमन लेखी यांनी कोर्टात सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close