S M L

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या महामोर्चा

27 जुलैहक्काच्या घरांसाठी उद्या गिरणी कामगार महामोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. या महामोर्चासाठी कोकण रेल्वेतून शेकडो गिरणी कामगार मुंबईला रवाना झाले आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र लढताना दिसतील. या नेत्यांच्या सहभागामुळे आपल्या लढ्याला बळ येईल असा विश्वास या कामगारांना वाटतोय. हक्काच्या घरासाठी कामगार सर्व सहा संघटना एकत्र लढा देण्यासाठी एकत्र झाल्या आहेत. त्याचं सोबत शिवसेना आणि मनसे या दोन मोठ्या पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहेत.दरम्यान, गिरणी कामगारांच्या प्रश्नावर उद्या निघणार्‍या मोर्चात राज आणि उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्याला आपल्या शुभेच्छा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यासाठीही ठाकरे बंधुंनी एकत्र यावे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 04:58 PM IST

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या महामोर्चा

27 जुलै

हक्काच्या घरांसाठी उद्या गिरणी कामगार महामोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. या महामोर्चासाठी कोकण रेल्वेतून शेकडो गिरणी कामगार मुंबईला रवाना झाले आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र लढताना दिसतील.

या नेत्यांच्या सहभागामुळे आपल्या लढ्याला बळ येईल असा विश्वास या कामगारांना वाटतोय. हक्काच्या घरासाठी कामगार सर्व सहा संघटना एकत्र लढा देण्यासाठी एकत्र झाल्या आहेत. त्याचं सोबत शिवसेना आणि मनसे या दोन मोठ्या पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहेत.

दरम्यान, गिरणी कामगारांच्या प्रश्नावर उद्या निघणार्‍या मोर्चात राज आणि उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्याला आपल्या शुभेच्छा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यासाठीही ठाकरे बंधुंनी एकत्र यावे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close