S M L

येडियुरप्पांना राजीनामा देण्याचा आदेश

28 जुलैकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी राजीनामा द्यावा असा निर्णय भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत झाला.आज सकाळी नवी दिल्लीत भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यात एकमताने हा निर्णय झाल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.कर्नाटकात आता सत्ताबदल होणं गरजेचं आहे. त्यामुळेच येडियुरप्पांनी लवकर राजीनामा पाठवून द्यावा असंही त्यांना सांगण्यात आलं. दरम्यान कर्नाटकातल्या नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी उद्या अरूण जेटली, राजनाथ सिंग हे उद्या कर्नाटकात जाणार आहेत. दरम्यान येडियुरप्पा इतक्या सहजासहजी राजीनामा देतीलं असं वाटत नाही. येडियुरप्पा बंडही करु शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा बंगळुरु कडे लागल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 09:46 AM IST

येडियुरप्पांना राजीनामा देण्याचा आदेश

28 जुलै

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी राजीनामा द्यावा असा निर्णय भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत झाला.आज सकाळी नवी दिल्लीत भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यात एकमताने हा निर्णय झाल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

कर्नाटकात आता सत्ताबदल होणं गरजेचं आहे. त्यामुळेच येडियुरप्पांनी लवकर राजीनामा पाठवून द्यावा असंही त्यांना सांगण्यात आलं. दरम्यान कर्नाटकातल्या नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी उद्या अरूण जेटली, राजनाथ सिंग हे उद्या कर्नाटकात जाणार आहेत.

दरम्यान येडियुरप्पा इतक्या सहजासहजी राजीनामा देतीलं असं वाटत नाही. येडियुरप्पा बंडही करु शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा बंगळुरु कडे लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close