S M L

गिरणी कामगारांच्या महामोर्चा आझाद मैदानात धडकला

28 जुलैगेली अनेक वर्ष आपल्या मागण्यांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. हा विराट मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. या मोर्चात गिरणी कामगारांच्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले या मोर्चात सहभागी झाले होते. घरांच्या किंमती गिरणी कामगारांना परवडण्याजोग्या ठेवाव्यात ही गिरणी कामगारांची मुख्य मागणी आहे. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून या मोर्चाची सुरूवात झाली. हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचला. तिथं विराट सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत गिरणी कामगारांच्या या लढाईची पुढची रणनिती ठरवली जाणार आहे. प्रचंड संख्येने या मोर्चात कामगार सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 10:08 AM IST

गिरणी कामगारांच्या महामोर्चा आझाद मैदानात धडकला

28 जुलै

गेली अनेक वर्ष आपल्या मागण्यांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. हा विराट मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. या मोर्चात गिरणी कामगारांच्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले या मोर्चात सहभागी झाले होते.

घरांच्या किंमती गिरणी कामगारांना परवडण्याजोग्या ठेवाव्यात ही गिरणी कामगारांची मुख्य मागणी आहे. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून या मोर्चाची सुरूवात झाली. हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचला. तिथं विराट सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत गिरणी कामगारांच्या या लढाईची पुढची रणनिती ठरवली जाणार आहे. प्रचंड संख्येने या मोर्चात कामगार सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close