S M L

शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या बंदमध्ये मनसे सहभागी होणार नाही - राज ठाकरे

28 जुलैगिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत असं वाटत असतांनाच या दोघांमध्ये पुन्हा मतभेदाला सुरूवात झाली. प्रस्तावित मंुबई बंदच्या मुद्यावरून सेना-मनसे आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. मनसे कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पण शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या प्रस्तावित बंदला मात्र मनसेचा विरोध आहे. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. बंद करून मुंबईकरांना वेठीस धरायला मनसेचा विरोध आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षाचे इतके आमदार आहेत. मग हा प्रश्न आमदारांच्या मदतीने सोडवला जाऊ शकतो. मनसेचा मुंबई बंदला पाठिंबा नाही. बंद करून मुंबईकरांना वेठीस धरायला मनसेचा विरोध आहे. असं राज यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 10:59 AM IST

शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या बंदमध्ये मनसे सहभागी होणार नाही - राज ठाकरे

28 जुलै

गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत असं वाटत असतांनाच या दोघांमध्ये पुन्हा मतभेदाला सुरूवात झाली. प्रस्तावित मंुबई बंदच्या मुद्यावरून सेना-मनसे आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

मनसे कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पण शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या प्रस्तावित बंदला मात्र मनसेचा विरोध आहे. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. बंद करून मुंबईकरांना वेठीस धरायला मनसेचा विरोध आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

विरोधी पक्षाचे इतके आमदार आहेत. मग हा प्रश्न आमदारांच्या मदतीने सोडवला जाऊ शकतो. मनसेचा मुंबई बंदला पाठिंबा नाही. बंद करून मुंबईकरांना वेठीस धरायला मनसेचा विरोध आहे. असं राज यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close