S M L

बंदमुळे आपलेच नुकसान - नाना पाटेकर

28 जुलैज्यांनी आमच्या अंगावर कपडे दिले, त्यांची मुलं उघडी राहू नये अशी विनंती अभिनेता नाना पाटेकर यांनी केली. तसेच शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या बंदच्या हकेला नाना पाटेकर यांने विरोध दर्शवला. गेली अनेक वर्ष आपल्या मागण्यांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात नाना पाटेकर ही सहभागी झाला होता. यावेळी नानाने ही मागणी केलीयसरकार लवकरच गिरणी कामगार्‍यांच्या मागण्या मान्य करतील आणि त्यांना आपले हक्काचे घर देतील असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. बंद पुकारल्यामुळे शेवटी आपलेच नुकसान होणार आहे त्यामुळे बंद होऊ नये अशी विनंती नाना पाटेकर यांनी केली. गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. हा विराट मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. या मोर्चात गिरणी कामगारांच्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले या मोर्चात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 03:02 PM IST

बंदमुळे आपलेच नुकसान - नाना पाटेकर

28 जुलै

ज्यांनी आमच्या अंगावर कपडे दिले, त्यांची मुलं उघडी राहू नये अशी विनंती अभिनेता नाना पाटेकर यांनी केली. तसेच शिवसेनेच्या 1 ऑगस्टच्या बंदच्या हकेला नाना पाटेकर यांने विरोध दर्शवला. गेली अनेक वर्ष आपल्या मागण्यांसाठी लढणार्‍या गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात नाना पाटेकर ही सहभागी झाला होता. यावेळी नानाने ही मागणी केलीय

सरकार लवकरच गिरणी कामगार्‍यांच्या मागण्या मान्य करतील आणि त्यांना आपले हक्काचे घर देतील असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. बंद पुकारल्यामुळे शेवटी आपलेच नुकसान होणार आहे त्यामुळे बंद होऊ नये अशी विनंती नाना पाटेकर यांनी केली. गिरणी कामगारांनी आज मुंबईत महामोर्चा काढला.

हा विराट मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. या मोर्चात गिरणी कामगारांच्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे रामदास आठवले या मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close