S M L

मधल्या सुटीत खेळले म्हणून विद्यार्थ्यांना रॉडने मारहाण

28 जुलैशाळेच्या मधल्या सुटीत खेळणार्‍या मुलांना मुख्याध्यापकानंच लोखंडी रॉडने मारहाण करत जबर जखमी केलं. हिंगोलीमधील सेनगावातील सालेगावच्या प्राथमिक शाळेत हा अमानुष प्रकार घडला. सालेगावात जिल्हापरिषदेची 1 ली ते 5 वीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तिथं शेजारच्या उटीपूर्णा गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. मधल्या सुटीतं विद्यार्थी खेळत असल्याचे पाहून, मुख्याध्यापक राजेंद्र पाळवेंना संताप आला आणि त्यांनी अक्षरश: लोखंडी रॉडने या विद्यार्थ्यांना झोडपून काढलं. हे विद्यार्थी रडत,ओरडत असतानाही बेभान झालेल्या मुख्याध्यापकांनी त्यांना इतकं मारलंय की अक्षरश: ही मुलं सोलवटून निघाली. तिघांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. या अमानुष मारहाणीत गंगाधर प्रल्हाद थोरात, बालाजी भिकाजी गडदे, सचिन माधव गडदे हे विद्यार्थी जबर जखमी झाले आहेत. तर बाकीच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाबद्दल गावकर्‍यांनी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 08:05 AM IST

मधल्या सुटीत खेळले म्हणून विद्यार्थ्यांना रॉडने मारहाण

28 जुलै

शाळेच्या मधल्या सुटीत खेळणार्‍या मुलांना मुख्याध्यापकानंच लोखंडी रॉडने मारहाण करत जबर जखमी केलं. हिंगोलीमधील सेनगावातील सालेगावच्या प्राथमिक शाळेत हा अमानुष प्रकार घडला. सालेगावात जिल्हापरिषदेची 1 ली ते 5 वीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. तिथं शेजारच्या उटीपूर्णा गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.

मधल्या सुटीतं विद्यार्थी खेळत असल्याचे पाहून, मुख्याध्यापक राजेंद्र पाळवेंना संताप आला आणि त्यांनी अक्षरश: लोखंडी रॉडने या विद्यार्थ्यांना झोडपून काढलं. हे विद्यार्थी रडत,ओरडत असतानाही बेभान झालेल्या मुख्याध्यापकांनी त्यांना इतकं मारलंय की अक्षरश: ही मुलं सोलवटून निघाली.

तिघांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. या अमानुष मारहाणीत गंगाधर प्रल्हाद थोरात, बालाजी भिकाजी गडदे, सचिन माधव गडदे हे विद्यार्थी जबर जखमी झाले आहेत. तर बाकीच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाबद्दल गावकर्‍यांनी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 08:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close