S M L

भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

14 नोव्हेंबर राजकोटइंग्लंडचे सर्व बॅटसमन 229 रन्सवर आऊट करून भारताने पहिली वनडे जिंकली. राजकोट वन डे मध्ये युवराजच्या धडाकेबाज सेंच्युरीनंतर इंग्लंडची डळमळीत सुरुवात झाली. त्याचे सर्व 229 रन्सवर आऊटवर झाले. त्यामुळे इंग्लडवर 158 रन्सने दणदणीत विजय मिळवला. याआधी सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडसमोर 387 रन्सचा डोंगर उभा केला. त्यात सिंहाचा वाटा उचलला तो भारताचा डावखुरा स्टार बॅटसमन युवराज सिंगनं. सीरिजच्या या पहिल्याच मॅचमध्ये पाहुण्यांना जबरदस्त दणका देत युवराजनं फोर आणि सिक्सची आतषबाजी करत दमदार सेंच्युरी ठोकली. पाठीच्या दुखापतीनं युवराज त्रस्त तरीही त्याने आपल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. युवराजनं फक्त 78 बॉल्समध्ये 6 सिक्स आणि 16 फोर ठोकत नाबाद 138 रन्स केले. मॅट प्रायर आणि ओवेस शाह हे त्यांचे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. कॅप्टन केविन पीटरसनचा अपवाद वगळता त्यांचे इतर बॅट्समन मैदानावर फक्त हजेरी लावून परतले. पीटरसनही 63 रन्सवर आउट झाला. भारतातर्फे झहीरखानने सर्वात जास्त 3 विकेटस काढल्या.युवराज सिंगला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 10:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close