S M L

दुसर्‍या टेस्टमधून गंभीर आऊट, श्रीसंत इन

29 जुलैभारत आणि इंग्लंडदरम्यान दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय योग्य ठरवत इशांत शर्माने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने एलिस्टर कूकला आऊट करून इंग्लंडला धक्का दिला. कूकला फक्त 2 रन करता आले. सध्या कॅप्टन ऍन्ड्र्यू स्ट्रॉस आणि जोनाथन ट्रॉट पीचवर आहेत. दरम्यान दुखापतीमुळे झहीर खान आणि गौतम गंभीर आजच्या मॅचमध्ये खेळत नाही. झहीर ऐवजी श्रीसंतला संधी देण्यात आली. तर ओपनिंगला अभिमन्यू मिथूनबरोबर राहूल द्रविड खेळणार आहे.इंग्लंडविरूध्द कसोटी मालिकेत 1-0 पिछाडीवर असताना दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाला एकापाठोपाठ एक हादरे बसत आहे.टेस्टपूर्वीच भारतीय ओपनर गौतम गंभीर दुसर्‍या टेस्टमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे गंभीर दुसर्‍या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या टेस्टमध्ये गंभीरच्या हाताला दुखापत झाली होती. गंभीरऐवजी टीममध्ये श्रीसंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राहुल द्रविड अभिमन्यू मिथुनबरोबर भारतीय इनिंगची सुरुवात करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 10:49 AM IST

दुसर्‍या टेस्टमधून गंभीर आऊट, श्रीसंत इन

29 जुलै

भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय योग्य ठरवत इशांत शर्माने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने एलिस्टर कूकला आऊट करून इंग्लंडला धक्का दिला.

कूकला फक्त 2 रन करता आले. सध्या कॅप्टन ऍन्ड्र्यू स्ट्रॉस आणि जोनाथन ट्रॉट पीचवर आहेत. दरम्यान दुखापतीमुळे झहीर खान आणि गौतम गंभीर आजच्या मॅचमध्ये खेळत नाही. झहीर ऐवजी श्रीसंतला संधी देण्यात आली. तर ओपनिंगला अभिमन्यू मिथूनबरोबर राहूल द्रविड खेळणार आहे.

इंग्लंडविरूध्द कसोटी मालिकेत 1-0 पिछाडीवर असताना दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाला एकापाठोपाठ एक हादरे बसत आहे.टेस्टपूर्वीच भारतीय ओपनर गौतम गंभीर दुसर्‍या टेस्टमधून बाहेर झाला आहे.

दुखापतीमुळे गंभीर दुसर्‍या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या टेस्टमध्ये गंभीरच्या हाताला दुखापत झाली होती. गंभीरऐवजी टीममध्ये श्रीसंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राहुल द्रविड अभिमन्यू मिथुनबरोबर भारतीय इनिंगची सुरुवात करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close