S M L

गिरणी कामगारांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

29 जुलैविधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गिरणी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या चर्चेला सुरुवात केली. खडसेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मोफत घरं देऊ असं वक्तव्य सभागृहात केलं होतं. त्यावर खडसे यांनी चुकीची माफी मागा किंवा शब्द पाळायचा नसल्यास राजीनामा द्या असं सुनावलं. राष्ट्रवादीने दिलेला शब्द काँग्रेसचे मुख्यमंत्री पाळतील का ? असा सवाल विचारला. नियमांमध्ये बदल केल्यानेच मालक जमीन घेऊ शकले आणि तिथे बिल्डर आले,असा आरोपही त्यांनी केला. तसेच ज्यांनी मुंबई महाराष्ट्रात आणली त्याला 12 लाख रुपयांत घर देता आणि ज्यांनी मुंबईमध्ये अतिक्रमण केलं त्याला फुकटात घर देता हा कोणता न्याय ? अशा शब्दांत खडसे यांनी सरकारवर जोरदार आक्रमण केलं. सध्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चर्चेला उत्तर देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 05:10 PM IST

गिरणी कामगारांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

29 जुलै

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गिरणी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या चर्चेला सुरुवात केली. खडसेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मोफत घरं देऊ असं वक्तव्य सभागृहात केलं होतं.

त्यावर खडसे यांनी चुकीची माफी मागा किंवा शब्द पाळायचा नसल्यास राजीनामा द्या असं सुनावलं. राष्ट्रवादीने दिलेला शब्द काँग्रेसचे मुख्यमंत्री पाळतील का ? असा सवाल विचारला. नियमांमध्ये बदल केल्यानेच मालक जमीन घेऊ शकले आणि तिथे बिल्डर आले,असा आरोपही त्यांनी केला.

तसेच ज्यांनी मुंबई महाराष्ट्रात आणली त्याला 12 लाख रुपयांत घर देता आणि ज्यांनी मुंबईमध्ये अतिक्रमण केलं त्याला फुकटात घर देता हा कोणता न्याय ? अशा शब्दांत खडसे यांनी सरकारवर जोरदार आक्रमण केलं. सध्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चर्चेला उत्तर देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close