S M L

बृहत आराखडा पूर्ण होण्याअगोदरच शाळांना नोटिसा

29 जुलैबृहत आराखडा पूर्ण होईपर्यंत मराठी शाळांवर कारवाई करणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण आता सरकारला स्वत:च्याच आश्वासनाचा विसर पडल्याचं दिसतंय. पुणे जिल्ह्यातल्या 17 शाळांना जिल्हा परिषदेनं नोटिस पाठवली. शाळा बंद केल्या नाही तर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीत देण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने मराठी शाळांना परवानगीच दिलेली नाही. इतकंच नाही तर परवानगी शिवाय सुरु असलेल्या विनाअनुदानित मराठी शाळा बंद करा नाहीतर एक लाख रुपये दंड आणि फौजदारी कारवाई करु असा बडगा राज्य सरकारने उगारला होता. त्याला संस्थाचालक आणि पालकांनी विरोध केला. त्याची दखल घेत सरकारने यासंबंधी बृहत आराखडा जाहीर होईपर्यंत कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिलं होतं. पण आता सरकार आपल्याच या आश्वासनाची पायमल्ली करताना दिसतं.दरम्यान या मुद्द्यावर सरकारची भूमिका योग्य नसून आता विरोधी पक्षांनी आता विधानसभेमध्ये आवाज उठवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि संस्थाचालकांकडून होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 04:13 PM IST

बृहत आराखडा पूर्ण होण्याअगोदरच शाळांना नोटिसा

29 जुलै

बृहत आराखडा पूर्ण होईपर्यंत मराठी शाळांवर कारवाई करणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण आता सरकारला स्वत:च्याच आश्वासनाचा विसर पडल्याचं दिसतंय. पुणे जिल्ह्यातल्या 17 शाळांना जिल्हा परिषदेनं नोटिस पाठवली.

शाळा बंद केल्या नाही तर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीत देण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने मराठी शाळांना परवानगीच दिलेली नाही. इतकंच नाही तर परवानगी शिवाय सुरु असलेल्या विनाअनुदानित मराठी शाळा बंद करा नाहीतर एक लाख रुपये दंड आणि फौजदारी कारवाई करु असा बडगा राज्य सरकारने उगारला होता.

त्याला संस्थाचालक आणि पालकांनी विरोध केला. त्याची दखल घेत सरकारने यासंबंधी बृहत आराखडा जाहीर होईपर्यंत कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिलं होतं. पण आता सरकार आपल्याच या आश्वासनाची पायमल्ली करताना दिसतं.

दरम्यान या मुद्द्यावर सरकारची भूमिका योग्य नसून आता विरोधी पक्षांनी आता विधानसभेमध्ये आवाज उठवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि संस्थाचालकांकडून होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close