S M L

1 ऑगस्टचा 'मुंबई बंद' मागे

30 जुलैगिरणी कामगारांच्या घरांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं 1 ऑगस्टला पुकारलेला प्रस्तावित मुंबई बंद मागे घेतला. पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. आणि उद्धव ठाकरेंना बंद मागे घेण्याचं आश्वासन केलं. त्यामुळे 1 ऑगस्टचा बंद रद्द करण्यात आला. मुख्यमत्र्यांनी चांगला निर्णय घेतला असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि रामदास कदम यांनी यावेळी म्हटलं. पण मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन पाळावे नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे हा बंद तूर्तास पुढे ढकलल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज गिरणी कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या प्रमुख तीन मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहे. गिरणी कामगारांना किती घरं आणि कुठल्या किमतीत घरं देता येतील, यासाठी एक समिती स्थापन करुन दोन महिन्यात गिरणी कामगारांना घरांच्या किंमती आणि संख्या सांगितली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. 1 जानेवारी 1982 पासून हजेरी पटावर असणार्‍या सर्व कामगार घरांसाठी पात्र असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत घरं असणार्‍या कामगारांनाही घरं देण्यात येईल अशी हमी कामगारांना देण्यात आली. गेल्या 11 वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा देणार्‍या गिरणी कामगारांना पाठिंबा दर्शवत शिवसेना आणि मनसेसह सर्वच विरोधी पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. जर गिरणी कामगारांना घर दिले नाही तर 1 ऑगस्टला मुंबई बंदची हाक शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली होती. हे आंदोलन शिवसेनेसाठी नाही तर ते गिरणी कामगारांच्या हक्कासाठी आहे असंही उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. या बंदला राज ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरण्यात अर्थ नाही असं सांगत आपल्या या बंदला पाठिंबा नाही असं स्पष्ट सांगितले होते. गिरणी कामगाराच्या या महामोर्चानंतर सरकारने त्वरीत बैठकी घेण्यास सुरूवात केली होती. कालच्या अधिवेशनाच्या दिवसात सुध्दा गिरणीकामगाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 12:08 PM IST

1 ऑगस्टचा 'मुंबई बंद' मागे

30 जुलै

गिरणी कामगारांच्या घरांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं 1 ऑगस्टला पुकारलेला प्रस्तावित मुंबई बंद मागे घेतला. पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. आणि उद्धव ठाकरेंना बंद मागे घेण्याचं आश्वासन केलं.

त्यामुळे 1 ऑगस्टचा बंद रद्द करण्यात आला. मुख्यमत्र्यांनी चांगला निर्णय घेतला असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि रामदास कदम यांनी यावेळी म्हटलं. पण मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन पाळावे नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे हा बंद तूर्तास पुढे ढकलल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आज गिरणी कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या प्रमुख तीन मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहे. गिरणी कामगारांना किती घरं आणि कुठल्या किमतीत घरं देता येतील, यासाठी एक समिती स्थापन करुन दोन महिन्यात गिरणी कामगारांना घरांच्या किंमती आणि संख्या सांगितली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.

1 जानेवारी 1982 पासून हजेरी पटावर असणार्‍या सर्व कामगार घरांसाठी पात्र असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत घरं असणार्‍या कामगारांनाही घरं देण्यात येईल अशी हमी कामगारांना देण्यात आली.

गेल्या 11 वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा देणार्‍या गिरणी कामगारांना पाठिंबा दर्शवत शिवसेना आणि मनसेसह सर्वच विरोधी पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. जर गिरणी कामगारांना घर दिले नाही तर 1 ऑगस्टला मुंबई बंदची हाक शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली होती.

हे आंदोलन शिवसेनेसाठी नाही तर ते गिरणी कामगारांच्या हक्कासाठी आहे असंही उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. या बंदला राज ठाकरे यांनी मुंबईकरांना वेठीस धरण्यात अर्थ नाही असं सांगत आपल्या या बंदला पाठिंबा नाही असं स्पष्ट सांगितले होते.

गिरणी कामगाराच्या या महामोर्चानंतर सरकारने त्वरीत बैठकी घेण्यास सुरूवात केली होती. कालच्या अधिवेशनाच्या दिवसात सुध्दा गिरणीकामगाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close