S M L

ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ अशोक रानडे यांचे निधन

30 जुलैज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि संगीत तज्ज्ञ अशोक रानडे यांचं दीर्घआजारानं मुंबईत निधन झालं. वांद्र्यातील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नुकताच त्यांना संगीत कला अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. एनसीपीए मध्येही त्यांनी काही काळ काम केलं होतं. व्हाईस कल्चरचे अनेक वर्कशॉप त्यांनी घेतले. अशोक रानडे यांची कारकीर्द - अशोक रानडे यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 साली झाला- मुंबई साहित्य सहवासमध्ये ते राहत होते- 1960 साली त्यांनी एलएलबीची पदवी घेतली- 1962 साली त्यांनी एम. ए. मराठीचं शिक्षण पूर्ण केलं- 1964 साली त्यांनी इंग्रजीतूनमधून एम.ए. पूर्ण केलं- तर 1976 साली संगीताचार्य ही अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामधून शिक्षण घेतलं- संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 04:06 PM IST

ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ अशोक रानडे यांचे निधन

30 जुलै

ज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि संगीत तज्ज्ञ अशोक रानडे यांचं दीर्घआजारानं मुंबईत निधन झालं. वांद्र्यातील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नुकताच त्यांना संगीत कला अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. एनसीपीए मध्येही त्यांनी काही काळ काम केलं होतं. व्हाईस कल्चरचे अनेक वर्कशॉप त्यांनी घेतले.

अशोक रानडे यांची कारकीर्द

- अशोक रानडे यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 साली झाला- मुंबई साहित्य सहवासमध्ये ते राहत होते- 1960 साली त्यांनी एलएलबीची पदवी घेतली- 1962 साली त्यांनी एम. ए. मराठीचं शिक्षण पूर्ण केलं- 1964 साली त्यांनी इंग्रजीतूनमधून एम.ए. पूर्ण केलं- तर 1976 साली संगीताचार्य ही अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामधून शिक्षण घेतलं- संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close