S M L

पूर्वा कोठारींच्या डिझायनर दागिन्यांचे प्रदर्शन

30 जुलैपूर्वा कोठारींच्या इंट्रिया ज्वेल्स या डिझायनर दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिल्लीत झालं. फेस्टिवल सीझनचा विचार करून अनेक नवे दागिने इथं मांडण्यात आले आहेत. हिर्‍यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यंदा हि-यासोबत बर्मीज रूबी आणि टँझनाइट्स सारख्या मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला. त्यामुळे दागिने जास्त आकर्षक दिसत आहेत. नववधूंसाठी विशेष ब्रायडल सेट्सही बनवण्यात आलेत. डिझायनर पूर्वा कोठारींचे दिल्लीतील हे पाचवे प्रदर्शन असून यंदा पहिल्यांदाच पुरुषांसाठीही कफलेट्स, अंगठ्या आणि पेन्स असे रत्नजडित गिफ्ट आयटम्स सादर करण्यात आले आहेत. यावेळी पूर्वा कोठारींचे वडिल आणि राज्यसभा खासदार विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन आज आणि उद्या दिल्लीतल्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 03:01 PM IST

पूर्वा कोठारींच्या डिझायनर दागिन्यांचे प्रदर्शन

30 जुलै

पूर्वा कोठारींच्या इंट्रिया ज्वेल्स या डिझायनर दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिल्लीत झालं. फेस्टिवल सीझनचा विचार करून अनेक नवे दागिने इथं मांडण्यात आले आहेत. हिर्‍यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

त्यामुळे यंदा हि-यासोबत बर्मीज रूबी आणि टँझनाइट्स सारख्या मौल्यवान रत्नांचा वापर करण्यात आला. त्यामुळे दागिने जास्त आकर्षक दिसत आहेत. नववधूंसाठी विशेष ब्रायडल सेट्सही बनवण्यात आलेत.

डिझायनर पूर्वा कोठारींचे दिल्लीतील हे पाचवे प्रदर्शन असून यंदा पहिल्यांदाच पुरुषांसाठीही कफलेट्स, अंगठ्या आणि पेन्स असे रत्नजडित गिफ्ट आयटम्स सादर करण्यात आले आहेत. यावेळी पूर्वा कोठारींचे वडिल आणि राज्यसभा खासदार विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन आज आणि उद्या दिल्लीतल्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close