S M L

टीम इंडिया 288 धावांवर सर्व बाद ; राहुलची दमदार सेंचुरी

30 जुलैट्रेंट ब्रिज टेस्टचा दुसरा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. भारताच्या राहुल द्रविडची सेंच्युरी आणि इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडची हॅट्ट्रिक दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. भारताची पहिली इनिंग 288 रन्सवर ऑलआऊट झाली. आणि पहिल्या इनिंगमध्ये भारताने 67 रन्सची आघाडी घेतली. याला उत्तर देताना इंग्लंडने दुसर्‍या दिवस अखेर 1 विकेट गमावत 24 रन्स केले. ऍलिस्ट कुकला आऊट करत ईशांत शर्माने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण यानंतर अँण्ड्र्यु स्ट्रॉस आणि ईयान बेलने दुसरा दिवस खेळून काढला. आता इंग्लंडची टीम 43 रन्सने पिछाडीवर आहे. त्याआधी राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकत दुसरा दिवस गाजवला. सीरिजमधली ही त्याची सलग दुसरी तर टेस्ट करियरमधील सलग 34वी सेंच्युरी ठरली. व्ही व्ही एस लक्ष्मण आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी केली. पण भारताला पहिल्या इनिंगमध्‌ेय मोठी आघाडी घेता आली नाही. इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर भारताचे इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडनं हॅट्ट्रिक घेतली. सचिन अगोदर राहुलची बाजी ; गावसकर,लाराशी केली बरोबरी ट्रेंटब्रिज टेस्टमध्ये राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी झळकावली. राहुल द्रविडसाठीही ही सेंच्युरी माईलस्टोन सेंच्युरी होती. कारण द्रविडची ही 34वी टेस्ट सेंच्युरी होती. त्याने सुनिल गावसकर आणि ब्रायन लारा यांच्या सेंच्युरीशी बरोबरी केली. 155 टेस्टमध्ये त्याने 34 सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीतही द्रविड सचिन तेंडुलकरनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. द्रविडच्या नावावर आता साडेबाराशेहून अधिक रन्स जमा आहेत. ट्रेंटब्रिज टेस्टमध्ये व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मदतीने त्याने सुरुवातीला सावध बॅटिंग करत भारताची इनिंग सावरली. लक्ष्मण 54 रन्सवर आऊट झाला. पण द्रविडचा मात्र मोठी खेळी करण्याचा इराद्या स्पष्ट होता. युवराज सिंगच्या मदतीने त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.सीरिजमधली ही त्याची सलग दुसरी सेंच्युरी ठरली. लॉर्ड्स टेस्टमध्ये द्रविडने 103 रन्सची शानदार खेळी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 03:48 PM IST

टीम इंडिया 288 धावांवर सर्व बाद ; राहुलची दमदार सेंचुरी

30 जुलै

ट्रेंट ब्रिज टेस्टचा दुसरा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. भारताच्या राहुल द्रविडची सेंच्युरी आणि इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडची हॅट्ट्रिक दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. भारताची पहिली इनिंग 288 रन्सवर ऑलआऊट झाली. आणि पहिल्या इनिंगमध्ये भारताने 67 रन्सची आघाडी घेतली. याला उत्तर देताना इंग्लंडने दुसर्‍या दिवस अखेर 1 विकेट गमावत 24 रन्स केले.

ऍलिस्ट कुकला आऊट करत ईशांत शर्माने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण यानंतर अँण्ड्र्यु स्ट्रॉस आणि ईयान बेलने दुसरा दिवस खेळून काढला. आता इंग्लंडची टीम 43 रन्सने पिछाडीवर आहे. त्याआधी राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी ठोकत दुसरा दिवस गाजवला.

सीरिजमधली ही त्याची सलग दुसरी तर टेस्ट करियरमधील सलग 34वी सेंच्युरी ठरली. व्ही व्ही एस लक्ष्मण आणि युवराज सिंगनंही हाफसेंच्युरी केली. पण भारताला पहिल्या इनिंगमध्‌ेय मोठी आघाडी घेता आली नाही. इंग्लंडच्या भेदक बॉलिंगसमोर भारताचे इतर बॅट्समन फ्लॉप ठरले. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडनं हॅट्ट्रिक घेतली.

सचिन अगोदर राहुलची बाजी ; गावसकर,लाराशी केली बरोबरी

ट्रेंटब्रिज टेस्टमध्ये राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी झळकावली. राहुल द्रविडसाठीही ही सेंच्युरी माईलस्टोन सेंच्युरी होती. कारण द्रविडची ही 34वी टेस्ट सेंच्युरी होती. त्याने सुनिल गावसकर आणि ब्रायन लारा यांच्या सेंच्युरीशी बरोबरी केली. 155 टेस्टमध्ये त्याने 34 सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी केली.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीतही द्रविड सचिन तेंडुलकरनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. द्रविडच्या नावावर आता साडेबाराशेहून अधिक रन्स जमा आहेत. ट्रेंटब्रिज टेस्टमध्ये व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मदतीने त्याने सुरुवातीला सावध बॅटिंग करत भारताची इनिंग सावरली. लक्ष्मण 54 रन्सवर आऊट झाला.

पण द्रविडचा मात्र मोठी खेळी करण्याचा इराद्या स्पष्ट होता. युवराज सिंगच्या मदतीने त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.सीरिजमधली ही त्याची सलग दुसरी सेंच्युरी ठरली. लॉर्ड्स टेस्टमध्ये द्रविडने 103 रन्सची शानदार खेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close