S M L

ऑनलाईन प्रवेशात कॉलेज टोकाला ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

अलका धुपकर, मुंबई.31 जुलैअकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांना यामध्ये सुरळीतपणे प्रवेश दिल्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला. पण ऑनलाईन प्रवेशासाठी भरायचे 35 कॉलेजेसचे ऑप्शन्स आणि दूर अंतरावरच्या कॉलेजमध्ये दिलेले प्रवेश ही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी यंदा मोठी समस्या ठरली.ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये राहणार्‍या संजय राव आणि त्यांचा मुलगा प्रणव यांची सध्या झोप उडाली आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी कॉलेज सुरु झालेलं नाही. कॉलेज सुरु होणं तर दूरची गोष्ट प्रवेशही मिळालाय तो 20 किलोमीटर दूरच्या कॉलेजमध्ये.ऑनलाईन प्रवेश फॉर्ममध्ये 35 कॉलेजेसचे ऑप्शन्स भरणे सक्तीचं असतं. एवढ्या सर्व कॉलेजेसची सखोल माहिती पालकांकडे उपलब्ध नसते. काही कॉलेजेस अंदाजाने भरली जातात. आणि तिथंच सगळा गोंधळ होतोय. गुणवत्ता असतानाही जास्त पैसे भरुन मॅनेजमेंट सीटसाठी प्रवेश घ्यायची वेळ ओढवतेय. 84.91 टक्के म्हणजे 85 टक्के मार्क्स मिळवलेल्या प्रणवला मुंब्रा येथे भारत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला.ऑनलाईन प्रवेशासाठी ज्या कॉलेजेसची नावं यादीत टाकली जातात. त्याच्या दर्जाची तपासणी शिक्षण विभागाने आधी करावी म्हणजे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप टळू शकेल अशी मागणी पालकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 12:08 PM IST

ऑनलाईन प्रवेशात कॉलेज टोकाला ; विद्यार्थ्यांना मनस्ताप

अलका धुपकर, मुंबई.

31 जुलै

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांना यामध्ये सुरळीतपणे प्रवेश दिल्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला. पण ऑनलाईन प्रवेशासाठी भरायचे 35 कॉलेजेसचे ऑप्शन्स आणि दूर अंतरावरच्या कॉलेजमध्ये दिलेले प्रवेश ही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी यंदा मोठी समस्या ठरली.

ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये राहणार्‍या संजय राव आणि त्यांचा मुलगा प्रणव यांची सध्या झोप उडाली आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी कॉलेज सुरु झालेलं नाही. कॉलेज सुरु होणं तर दूरची गोष्ट प्रवेशही मिळालाय तो 20 किलोमीटर दूरच्या कॉलेजमध्ये.

ऑनलाईन प्रवेश फॉर्ममध्ये 35 कॉलेजेसचे ऑप्शन्स भरणे सक्तीचं असतं. एवढ्या सर्व कॉलेजेसची सखोल माहिती पालकांकडे उपलब्ध नसते. काही कॉलेजेस अंदाजाने भरली जातात. आणि तिथंच सगळा गोंधळ होतोय. गुणवत्ता असतानाही जास्त पैसे भरुन मॅनेजमेंट सीटसाठी प्रवेश घ्यायची वेळ ओढवतेय. 84.91 टक्के म्हणजे 85 टक्के मार्क्स मिळवलेल्या प्रणवला मुंब्रा येथे भारत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला.

ऑनलाईन प्रवेशासाठी ज्या कॉलेजेसची नावं यादीत टाकली जातात. त्याच्या दर्जाची तपासणी शिक्षण विभागाने आधी करावी म्हणजे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप टळू शकेल अशी मागणी पालकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close