S M L

येडियुरप्पांचा अखेर राजीनामा

31 जुलैकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. आज सकाळी येडियुरप्पा यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आणि काही वेळापूर्वी त्यांनी राज्यपालांकडंही तो सुपूर्द केला. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय नाट्यावर अखेरचा पडदा पडला. कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी बी.एस. यडियुरप्पा यांच्यावर खाण मालकांकडून लाच घेतल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे येडियुरप्पांवर कारवाई करणे भाजपला भाग पडले. आणि पक्षाने त्यांना पायउतार व्हायला सांगितले. यानंतर आपण राजीनामा देणार हे जाहीर केले.पण तरीही गेले दोन-तीन दिवस त्यांनी सगळ्यांनाच झुलवत ठेवलं. दरम्यान आपल्याला हवा तोच मुख्यमंत्री केला जावा असा त्यांनी आग्रहही धरला होता. पण पक्षाने कठोर भूमिका घेतल्याने अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता उत्सुकता आहे ती कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याची. येडियुरप्पांचा राजकीय प्रवासदक्षिण भारतात भाजपची वाढ करण्याचे तसेच तिथल्या राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवून देण्याचे श्रेय येडियुरप्पा यांना जातं. यात त्यांनी अनेक चढउतारसुद्धा पाहिले. बी. एस. येडियुरप्पा. मुख्यमंत्रीपदच्या कार्यकाळात गेल्या 38 महिन्यांत तब्बल 5 वेळा त्यांना जीवदान मिळालं. पण सहाव्यांदा मात्र ते नशीबवान ठरले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करणे भाजप नेतृत्वाला अखेर भाग पडले. दक्षिण भारतात भाजपची पहिल्यांदा सत्ता आणण्याचे ऐतिहासिक काम येडियुरप्पांनी केले. पण आता त्यांच्यासाठी पुढचा प्रवास मात्र खडतर आहे. जवळपास चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात येडियुरप्पा कर्नाटकात भाजपचे तारणहार ठरले. पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मात्र सोपी नव्हती. 1960 मध्ये शिमोगा जिल्ह्यातील एका राईस मिलमध्ये क्लर्क म्हणून येडियुरप्पांच्या जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते राजकारणात एकेक पायरी चढत गेले. पहिल्यांदा नगरसेवक, त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारतातले भाजपचे एकमेव आमदार, आणि शेवटी 1994 मध्ये विरोधी पक्षनेते. येडियुरप्पा यांच्या आयुष्याला पहिली मोठी कलाटणी मिळाली ती 2006 मध्ये. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी आणि येडियुरप्पा यांनी विधानसभेचा मार्ग एकत्र चालण्याचा निर्णय घेतला. पण जेडीएस- भाजपच्या 20-20 महिन्यांच्या सत्तावाटपाचा हा प्रयोग फसला. आणि 2007 मध्ये केवळ सात दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर येडियुरप्पांना गौडांनी बाहेरचा रस्ता दाखवला. जेडीएसच्या या विश्वासघातामुळे येडियुरप्पा प्रचंड दुखावले गेले. आणि 2008 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं.येडियुरप्पा यांचा 38 महिन्यांचा कार्यकाळ अनेक चढउतारांनी व्यापला. 2009 च्या लोकसभा निवडणुकींसह राज्यातील प्रत्येक निवडणूक येडियुरप्पांनी भाजपला जिंकून दिली. पण त्यांचे प्रशासन मात्र घोटाळ्यांचे आरोप, अंतर्गत हेवेदावे, रेड्डी बंधूंशी संघर्ष आणि कुटुंबीयांचे मायनिंग माफियांशी संबंध यामुळे वादात सापडले. गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षांच्या कार्यकाळात येडियुरप्पांनी कर्नाटकात अक्षरशः एकहाती भाजपची बांधणी केली. पण अखेर ते एक अपयशी हिरो ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 11:37 AM IST

येडियुरप्पांचा अखेर राजीनामा

31 जुलै

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. आज सकाळी येडियुरप्पा यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आणि काही वेळापूर्वी त्यांनी राज्यपालांकडंही तो सुपूर्द केला. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय नाट्यावर अखेरचा पडदा पडला.

कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी बी.एस. यडियुरप्पा यांच्यावर खाण मालकांकडून लाच घेतल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे येडियुरप्पांवर कारवाई करणे भाजपला भाग पडले. आणि पक्षाने त्यांना पायउतार व्हायला सांगितले. यानंतर आपण राजीनामा देणार हे जाहीर केले.

पण तरीही गेले दोन-तीन दिवस त्यांनी सगळ्यांनाच झुलवत ठेवलं. दरम्यान आपल्याला हवा तोच मुख्यमंत्री केला जावा असा त्यांनी आग्रहही धरला होता. पण पक्षाने कठोर भूमिका घेतल्याने अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता उत्सुकता आहे ती कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याची.

येडियुरप्पांचा राजकीय प्रवास

दक्षिण भारतात भाजपची वाढ करण्याचे तसेच तिथल्या राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवून देण्याचे श्रेय येडियुरप्पा यांना जातं. यात त्यांनी अनेक चढउतारसुद्धा पाहिले.

बी. एस. येडियुरप्पा. मुख्यमंत्रीपदच्या कार्यकाळात गेल्या 38 महिन्यांत तब्बल 5 वेळा त्यांना जीवदान मिळालं. पण सहाव्यांदा मात्र ते नशीबवान ठरले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करणे भाजप नेतृत्वाला अखेर भाग पडले. दक्षिण भारतात भाजपची पहिल्यांदा सत्ता आणण्याचे ऐतिहासिक काम येडियुरप्पांनी केले.

पण आता त्यांच्यासाठी पुढचा प्रवास मात्र खडतर आहे. जवळपास चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात येडियुरप्पा कर्नाटकात भाजपचे तारणहार ठरले. पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मात्र सोपी नव्हती. 1960 मध्ये शिमोगा जिल्ह्यातील एका राईस मिलमध्ये क्लर्क म्हणून येडियुरप्पांच्या जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते राजकारणात एकेक पायरी चढत गेले. पहिल्यांदा नगरसेवक, त्यानंतर संपूर्ण दक्षिण भारतातले भाजपचे एकमेव आमदार, आणि शेवटी 1994 मध्ये विरोधी पक्षनेते.

येडियुरप्पा यांच्या आयुष्याला पहिली मोठी कलाटणी मिळाली ती 2006 मध्ये. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी आणि येडियुरप्पा यांनी विधानसभेचा मार्ग एकत्र चालण्याचा निर्णय घेतला.

पण जेडीएस- भाजपच्या 20-20 महिन्यांच्या सत्तावाटपाचा हा प्रयोग फसला. आणि 2007 मध्ये केवळ सात दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर येडियुरप्पांना गौडांनी बाहेरचा रस्ता दाखवला. जेडीएसच्या या विश्वासघातामुळे येडियुरप्पा प्रचंड दुखावले गेले. आणि 2008 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिलं.

येडियुरप्पा यांचा 38 महिन्यांचा कार्यकाळ अनेक चढउतारांनी व्यापला. 2009 च्या लोकसभा निवडणुकींसह राज्यातील प्रत्येक निवडणूक येडियुरप्पांनी भाजपला जिंकून दिली. पण त्यांचे प्रशासन मात्र घोटाळ्यांचे आरोप, अंतर्गत हेवेदावे, रेड्डी बंधूंशी संघर्ष आणि कुटुंबीयांचे मायनिंग माफियांशी संबंध यामुळे वादात सापडले.

गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षांच्या कार्यकाळात येडियुरप्पांनी कर्नाटकात अक्षरशः एकहाती भाजपची बांधणी केली. पण अखेर ते एक अपयशी हिरो ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close