S M L

यु. म.पठाण यांना डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्कार

31 जुलैसंत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यु. म.पठाण यांना 'डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. साहित्य क्षेत्रात भरिव कामगिरी करणार्‍या दोन साहित्यिकांना डॉ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा गौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा डॉ. यु. म. पठाण आणि स. दा. कर्‍हाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांच्या कन्या कविता निरगुडकर यांच्या उपस्थितीत डॉ. यू म पठाण यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिकांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याची या पुरस्काराची परंपरा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 03:31 PM IST

यु. म.पठाण यांना डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्कार

31 जुलै

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यु. म.पठाण यांना 'डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. साहित्य क्षेत्रात भरिव कामगिरी करणार्‍या दोन साहित्यिकांना डॉ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा गौरव पुरस्कार देण्यात येतो.

यंदा डॉ. यु. म. पठाण आणि स. दा. कर्‍हाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांच्या कन्या कविता निरगुडकर यांच्या उपस्थितीत डॉ. यू म पठाण यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिकांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याची या पुरस्काराची परंपरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close