S M L

आदर्श प्रकरणी सुशीलकुमार शिंदेंची जबाब नोंदणी

31 जुलैकेंद्रीय ऊर्जामंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दिल्लीतल्या घरी दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने त्यांची जबाबनोंदणी पूर्ण केली. आदर्श घोटाळाप्रकरणी एक साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सीबीआयचे पथक दिल्लीत त्यांच्या घरी दाखल झाल होतं. आदर्श घोटाळा उघड झाल्यानंतर याप्रकरणात सुशीलकुमार शिंदेही सहभागी असल्याचा आरोप झाला होता. पण शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. सुशील कुमार शिंदे यांचा याप्रकरणाशी काय संबंध - 9 जुलै 2004 ला सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या सहीने आदर्श सोसायटीला जमीन वाटपपत्र जारी झालं. - 23 ऑगस्ट 2004 ला सुशीलकुमार शिंदे यांनी आदर्शच्या वाढीव 51 नागरी सदस्यांच्या फ्लॅट वितरणाला मंजुरी दिली.तर शिंदेंनी आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय प्रतिज्ञापत्रात सुशिलकुमार म्हणतात, "आदर्शला माझ्या आधीच्या काळात दिलं गेलेलं इरादापत्रंच सगळ्या परवानग्यांचे मूळ आहे. इरादापत्रामुळेच आदर्शला जमीन उपलब्ध करून देण्यात आली. इरादापत्राच्या अधीन राहूनच पुढे आदर्शला इतर परवानग्या दिल्या गेल्या. इरादापत्राच्या आधारेच आपण जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्‍यांनी तपासलेल्या वाढीव 51 सदस्यांच्या यादीला मंजुरी दिली. तसेच इरादापत्रामध्येच आदर्शची जमीन सीआरझेड-टू मध्ये येत असल्याचे नमूद करण्यात आलंय."

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 05:00 PM IST

आदर्श प्रकरणी सुशीलकुमार शिंदेंची जबाब नोंदणी

31 जुलै

केंद्रीय ऊर्जामंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दिल्लीतल्या घरी दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने त्यांची जबाबनोंदणी पूर्ण केली. आदर्श घोटाळाप्रकरणी एक साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सीबीआयचे पथक दिल्लीत त्यांच्या घरी दाखल झाल होतं. आदर्श घोटाळा उघड झाल्यानंतर याप्रकरणात सुशीलकुमार शिंदेही सहभागी असल्याचा आरोप झाला होता. पण शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

सुशील कुमार शिंदे यांचा याप्रकरणाशी काय संबंध

- 9 जुलै 2004 ला सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या सहीने आदर्श सोसायटीला जमीन वाटपपत्र जारी झालं. - 23 ऑगस्ट 2004 ला सुशीलकुमार शिंदे यांनी आदर्शच्या वाढीव 51 नागरी सदस्यांच्या फ्लॅट वितरणाला मंजुरी दिली.

तर शिंदेंनी आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय

प्रतिज्ञापत्रात सुशिलकुमार म्हणतात, "आदर्शला माझ्या आधीच्या काळात दिलं गेलेलं इरादापत्रंच सगळ्या परवानग्यांचे मूळ आहे. इरादापत्रामुळेच आदर्शला जमीन उपलब्ध करून देण्यात आली. इरादापत्राच्या अधीन राहूनच पुढे आदर्शला इतर परवानग्या दिल्या गेल्या.

इरादापत्राच्या आधारेच आपण जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्‍यांनी तपासलेल्या वाढीव 51 सदस्यांच्या यादीला मंजुरी दिली. तसेच इरादापत्रामध्येच आदर्शची जमीन सीआरझेड-टू मध्ये येत असल्याचे नमूद करण्यात आलंय."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close