S M L

अण्णांना राज्यभरातून पाठिंबा

01 ऑगस्ट16 ऑगस्टपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाला मुंबई आणि महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या वेबसाईटवर ऑनलाईन तर पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नोंदणी करण्यात येतेय. आतापर्यंत मुंबईत जवळपास 55 हजार लोकांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यात डबेवाल्यांची संघटना, बॅक एम्प्लॉई असोसिएशन, बार काऊन्सिल, टेक्सटाईल असोसिएशन, डायमंड असोसिएशन, कामगार संघटना अशा 20 संघटनांचा पाठिंबा आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदान मुख्य ठिकाण असणार आहे तर ज्या ठिकाणी पाचशे पेशा जास्त लोक साखळी उपोषणाला बसतील ते सबस्टेशन असणार आहे. अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला जनतेचं समर्थन मिळावे यासाठी अमरावती शहरात जनमत घेण्यात आलं. जनतेनं अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला भरघोस पाठिंबा दिल्याचे मतमोजणीत स्पष्ट झालंय. पीपल्स फॉर इंडिया फोरम आणि ऑल इंडिया नवोदय ऑर्गनायजेशनच्या वतीने जनमत चाचणी घेण्यात आली. शहरात जवळपास 134 केंद्रावर मतदान घेण्यात आलं. यामध्ये 1 लाख 20 हजार 483 लोकांनी या मतदान केलं. यात महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त होती. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 1 लाख 18 हजार नागरिकांनी लोकपालच्या समर्थनार्थ मतदान केलं. केवळ 880 लोकांनी लोकपालला विरोध केला. जनतेच्या भरघोस प्रतिसादानंतर येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभा घेवून ग्रामीण भागात विधेयकासंदर्भात जनजागृती करण्यात येईल अस आयोजकांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 04:47 PM IST

अण्णांना राज्यभरातून पाठिंबा

01 ऑगस्ट

16 ऑगस्टपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाला मुंबई आणि महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या वेबसाईटवर ऑनलाईन तर पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नोंदणी करण्यात येतेय.

आतापर्यंत मुंबईत जवळपास 55 हजार लोकांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यात डबेवाल्यांची संघटना, बॅक एम्प्लॉई असोसिएशन, बार काऊन्सिल, टेक्सटाईल असोसिएशन, डायमंड असोसिएशन, कामगार संघटना अशा 20 संघटनांचा पाठिंबा आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदान मुख्य ठिकाण असणार आहे तर ज्या ठिकाणी पाचशे पेशा जास्त लोक साखळी उपोषणाला बसतील ते सबस्टेशन असणार आहे.

अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला जनतेचं समर्थन मिळावे यासाठी अमरावती शहरात जनमत घेण्यात आलं. जनतेनं अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला भरघोस पाठिंबा दिल्याचे मतमोजणीत स्पष्ट झालंय. पीपल्स फॉर इंडिया फोरम आणि ऑल इंडिया नवोदय ऑर्गनायजेशनच्या वतीने जनमत चाचणी घेण्यात आली.

शहरात जवळपास 134 केंद्रावर मतदान घेण्यात आलं. यामध्ये 1 लाख 20 हजार 483 लोकांनी या मतदान केलं. यात महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त होती. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 1 लाख 18 हजार नागरिकांनी लोकपालच्या समर्थनार्थ मतदान केलं. केवळ 880 लोकांनी लोकपालला विरोध केला. जनतेच्या भरघोस प्रतिसादानंतर येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभा घेवून ग्रामीण भागात विधेयकासंदर्भात जनजागृती करण्यात येईल अस आयोजकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close