S M L

उपोषण होणारच - अण्णा हजारे

01 ऑगस्टसरकारने जर जंतर मंतरवरचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर स्वत:ला अटक करवून घेण्याचा पुन्हा एकदा अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषेदत अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही लोकशाही आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. जनलोकपालासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन च्यावतीने जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत बहुतांश जणांनी नागरी समितीच्या मसुद्याला पाठिंबा व्यक्त केला. पंतप्रधानांनाही लोकपालाच्या कक्षेत आणावे असं मतही 82 % लोकांनी व्यक्त केलं. जनलोकपालासाठी प्राण असेपर्यंत लढणार सरकार जनतेचा आवाज ऐकणार आहे की नाही ? असा सवालही अण्णांनी केला. जनमत चाचणीसाठी अण्णांच्या टीमने दिल्लीतल्या कपिल सिब्बल यांच्या चांदणी चौक मतदारसंघात 4 लाख फॉर्म्स वाटले होते. त्यापैकी आता 72 हजार फॉर्म्सची चाचणी मिळाली. लोकांना 8 प्रश्न विचारण्यात आले होते. तिढा लोकपालचा कौल जनतेचा 1. सिटीझन चार्टर्सचं उल्लंघन केल्यावर अधिकार्‍याला शिक्षा व्हावी?हो - 85% नको - 7%2. लोकपालाच्या अधिकारकक्षेत सर्वच अधिकारी यावेत ?हो - 89%फक्त वरिष्ठ अधिकारी - 4.6%3. लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावेत का ?होय - 85%नाही - 15%4. लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारणार्‍या खासदाराची चौकशी लोकपालाने करावी का?होय - 88%नाही - 12%5. लोकपालाच्या अधिकारकक्षेत वरिष्ठ न्यायाधीश असावेत?होय - 86%नाही - 14%6. पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यावेत?होय - 82% नाही - 6%7. चौकशीनंतर भ्रष्ट अधिकार्‍याला नोकरीवरून काढण्याचा अधिकार लोकपालाला हवा?हो - 84% नाही - 16%8. संसदेत लोकपालावर मतदानावेळी खासदारानं जनतेचं ऐकावं की पार्टी हायकमांडचं?जनतेचं ऐकावं - 83%

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 09:16 AM IST

उपोषण होणारच - अण्णा हजारे

01 ऑगस्ट

सरकारने जर जंतर मंतरवरचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर स्वत:ला अटक करवून घेण्याचा पुन्हा एकदा अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषेदत अण्णांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही लोकशाही आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. जनलोकपालासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन च्यावतीने जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत बहुतांश जणांनी नागरी समितीच्या मसुद्याला पाठिंबा व्यक्त केला. पंतप्रधानांनाही लोकपालाच्या कक्षेत आणावे असं मतही 82 % लोकांनी व्यक्त केलं. जनलोकपालासाठी प्राण असेपर्यंत लढणार सरकार जनतेचा आवाज ऐकणार आहे की नाही ? असा सवालही अण्णांनी केला.

जनमत चाचणीसाठी अण्णांच्या टीमने दिल्लीतल्या कपिल सिब्बल यांच्या चांदणी चौक मतदारसंघात 4 लाख फॉर्म्स वाटले होते. त्यापैकी आता 72 हजार फॉर्म्सची चाचणी मिळाली. लोकांना 8 प्रश्न विचारण्यात आले होते.

तिढा लोकपालचा कौल जनतेचा

1. सिटीझन चार्टर्सचं उल्लंघन केल्यावर अधिकार्‍याला शिक्षा व्हावी?हो - 85% नको - 7%2. लोकपालाच्या अधिकारकक्षेत सर्वच अधिकारी यावेत ?हो - 89%फक्त वरिष्ठ अधिकारी - 4.6%3. लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावेत का ?होय - 85%नाही - 15%4. लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारणार्‍या खासदाराची चौकशी लोकपालाने करावी का?होय - 88%नाही - 12%5. लोकपालाच्या अधिकारकक्षेत वरिष्ठ न्यायाधीश असावेत?होय - 86%नाही - 14%6. पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यावेत?होय - 82% नाही - 6%7. चौकशीनंतर भ्रष्ट अधिकार्‍याला नोकरीवरून काढण्याचा अधिकार लोकपालाला हवा?हो - 84% नाही - 16%8. संसदेत लोकपालावर मतदानावेळी खासदारानं जनतेचं ऐकावं की पार्टी हायकमांडचं?जनतेचं ऐकावं - 83%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close