S M L

कौल असा असेल तर अण्णांनी निवडणूक लढवावी !

01 ऑगस्टसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज पुन्हा लोकपालचा मुद्दा गाजला. अण्णांच्या टीमने दिल्लीत घेतलेल्या जनमत चाचणीत पोलमध्ये 85 टक्के लोकांनी अण्णांच्या मसुद्याला पाठिंबा दिला. पण सरकारने या पोलची खिल्ली उडवली. दिल्लीतल्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात ही चाचणी घेण्यात आला. हा मतदारसंघ काँग्रेसच्या कपिल सिबल यांचा आहे. इथल्या एकूण 40 लाखांपैकी सुमारे 80 हजार मतदारांना प्रश्नपत्रिका देऊन हा पोल घेण्यात आला. यात लोकांनी लोकपालच्या सरकारी मसुद्याला नाकारले आणि अण्णांच्या मसुद्याला भरभरून प्रतिसाद दिला असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. पण ही चाचणी जर अण्णांनीच घेतली होती तर त्यांनी स्वतःला 100 टक्के मतं का नाही दाखवली असा टोला कपिल सिब्बल यांनी मारला. टीम अण्णाकडून घेण्यात आलेली ही पोल सर्वसमावेशक नसली, तरी त्यामुळे लोकांचा कल काय आहे हे नक्कीच लक्षात येतं. त्यातच 16 तारखेपासून अण्णांचे उपोषण सुरू होतंय. त्यामुळे या ओपिनियन पोलची दखल सरकारला घ्यावी लागू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 05:35 PM IST

कौल असा असेल तर अण्णांनी निवडणूक लढवावी !

01 ऑगस्ट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज पुन्हा लोकपालचा मुद्दा गाजला. अण्णांच्या टीमने दिल्लीत घेतलेल्या जनमत चाचणीत पोलमध्ये 85 टक्के लोकांनी अण्णांच्या मसुद्याला पाठिंबा दिला. पण सरकारने या पोलची खिल्ली उडवली.

दिल्लीतल्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात ही चाचणी घेण्यात आला. हा मतदारसंघ काँग्रेसच्या कपिल सिबल यांचा आहे. इथल्या एकूण 40 लाखांपैकी सुमारे 80 हजार मतदारांना प्रश्नपत्रिका देऊन हा पोल घेण्यात आला. यात लोकांनी लोकपालच्या सरकारी मसुद्याला नाकारले आणि अण्णांच्या मसुद्याला भरभरून प्रतिसाद दिला असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

पण ही चाचणी जर अण्णांनीच घेतली होती तर त्यांनी स्वतःला 100 टक्के मतं का नाही दाखवली असा टोला कपिल सिब्बल यांनी मारला. टीम अण्णाकडून घेण्यात आलेली ही पोल सर्वसमावेशक नसली, तरी त्यामुळे लोकांचा कल काय आहे हे नक्कीच लक्षात येतं. त्यातच 16 तारखेपासून अण्णांचे उपोषण सुरू होतंय. त्यामुळे या ओपिनियन पोलची दखल सरकारला घ्यावी लागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close