S M L

अमरावतीत 'लोकपाल'ला पाठिंब्यासाठी जनमत चाचणी

01 ऑगस्टजन लोकपाल विधेयकाला जनतेचे समर्थन मिळावे यासाठी अमरावती शहरात जनमत घेण्यात आलं. जनतेनं अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला भरघोस पाठिंबा दिल्याचं मतमोजणीत स्पष्ट झालं. पीपल्स फॉर इंडिया फोरम आणि ऑल इंडिया नवोदय ऑर्गनायजेशनच्या वतीने जनमत चाचणी घेण्यात आली. शहरात जवळपास 134 केंद्रावर मतदान घेण्यात आलं. यामध्ये 1 लाख 20 हजार 483 लोकांनी या मतदान केलं. यात महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त होती. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 1 लाख 18 हजार नागरिकांनाी लोकपालच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर फक्त 880 लोकांनी लोकपालला विरोध केला. जनतेच्या भरघोस प्रतिसादानंतर येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभा घेऊन ग्रामीण भागात विधेयकासंदर्भात जनजागृती करण्यात येईल अस आयोजकांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 01:59 PM IST

अमरावतीत 'लोकपाल'ला पाठिंब्यासाठी जनमत चाचणी

01 ऑगस्ट

जन लोकपाल विधेयकाला जनतेचे समर्थन मिळावे यासाठी अमरावती शहरात जनमत घेण्यात आलं. जनतेनं अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाला भरघोस पाठिंबा दिल्याचं मतमोजणीत स्पष्ट झालं. पीपल्स फॉर इंडिया फोरम आणि ऑल इंडिया नवोदय ऑर्गनायजेशनच्या वतीने जनमत चाचणी घेण्यात आली.

शहरात जवळपास 134 केंद्रावर मतदान घेण्यात आलं. यामध्ये 1 लाख 20 हजार 483 लोकांनी या मतदान केलं. यात महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त होती. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 1 लाख 18 हजार नागरिकांनाी लोकपालच्या समर्थनार्थ मतदान केलं.

तर फक्त 880 लोकांनी लोकपालला विरोध केला. जनतेच्या भरघोस प्रतिसादानंतर येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभा घेऊन ग्रामीण भागात विधेयकासंदर्भात जनजागृती करण्यात येईल अस आयोजकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close