S M L

इंग्लंडची बाजी ; भारताचा दारूण पराभव

01 ऑगस्टट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये भारतीय टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यजमान इंग्लंडने भारताचा तब्बल 319 रन्सने धुव्वा उडवला. 478 रन्सचे बलाढ्य टार्गेट समोर ठेवून खेळणार्‍या भारताची दुसरी इनिंग फक्त 158 रन्सवर ऑलआऊट झाली. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि प्रवीण कुमारचा अपवाद वगळात भारताच्या एकाही बॅट्समनला रन्सचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारतीय इनिंगची सुरवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला राहुल द्रविड झटपट आऊट झाला आणि यानंतर भारतीय बॅट्समन एकामागोमाग एक आऊट होत गेले. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगने थोडी फार झुंज दिली. पण अँडरसनने सचिनला तर ब्रेसनने हरभजन सिंगला आऊट केलं आणि विजयातला अडसर दुर केला. सचिन तेंडुलकर 56 तर हरभजन सिंग 46 रन्सवर आऊट झाले आणि मॅचच्या चौथ्याच दिवशी भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडच्या टीम ब्रेसनननं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसनने आणि स्टुअर्ट ब्रॉडने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. ऑलराऊंड कामगिरी करणारा स्टुअर्ट ब्रॉड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 06:03 PM IST

इंग्लंडची बाजी ; भारताचा दारूण पराभव

01 ऑगस्ट

ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये भारतीय टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यजमान इंग्लंडने भारताचा तब्बल 319 रन्सने धुव्वा उडवला. 478 रन्सचे बलाढ्य टार्गेट समोर ठेवून खेळणार्‍या भारताची दुसरी इनिंग फक्त 158 रन्सवर ऑलआऊट झाली. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि प्रवीण कुमारचा अपवाद वगळात भारताच्या एकाही बॅट्समनला रन्सचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

भारतीय इनिंगची सुरवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला राहुल द्रविड झटपट आऊट झाला आणि यानंतर भारतीय बॅट्समन एकामागोमाग एक आऊट होत गेले. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगने थोडी फार झुंज दिली. पण अँडरसनने सचिनला तर ब्रेसनने हरभजन सिंगला आऊट केलं आणि विजयातला अडसर दुर केला.

सचिन तेंडुलकर 56 तर हरभजन सिंग 46 रन्सवर आऊट झाले आणि मॅचच्या चौथ्याच दिवशी भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडच्या टीम ब्रेसनननं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसनने आणि स्टुअर्ट ब्रॉडने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. ऑलराऊंड कामगिरी करणारा स्टुअर्ट ब्रॉड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close