S M L

राणेंना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिवसेनेची मागणी

02 ऑगस्टनारायण राणे यांचं नाव आदर्श प्रकरणात आल्यानं त्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. राणे याचं नाव आल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशी मागणी शिवसेनेनं विधिमंडळात केली. मात्र आदर्श सोसायटीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने विधिमंडळात त्यांची चर्चा करणे योग्य होणार अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतली. अध्यक्षांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, विधानपरिषदेतही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 1999 साली नारायण राणे मुख्यमंत्री असताना आदर्शचे मुख्य प्रवर्तक यांनी राणेंना पत्र लिहून जमीन देण्याची विनंती केली होती. त्यावर नारायण राणे यांनी तत्काळ चौकशी करुन अहवाल मागवला होता. अशी साक्ष महसूल विभागाच्या उपसचिवांनी न्यायालयीन आयोगासमोर दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 06:13 PM IST

राणेंना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिवसेनेची मागणी

02 ऑगस्ट

नारायण राणे यांचं नाव आदर्श प्रकरणात आल्यानं त्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. राणे याचं नाव आल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशी मागणी शिवसेनेनं विधिमंडळात केली. मात्र आदर्श सोसायटीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने विधिमंडळात त्यांची चर्चा करणे योग्य होणार अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतली.

अध्यक्षांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, विधानपरिषदेतही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 1999 साली नारायण राणे मुख्यमंत्री असताना आदर्शचे मुख्य प्रवर्तक यांनी राणेंना पत्र लिहून जमीन देण्याची विनंती केली होती. त्यावर नारायण राणे यांनी तत्काळ चौकशी करुन अहवाल मागवला होता. अशी साक्ष महसूल विभागाच्या उपसचिवांनी न्यायालयीन आयोगासमोर दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close