S M L

भ्रष्टाचार - महागाईच्या मुद्यावर संसदेत गदारोळ

02 ऑगस्टआज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात काहीही कामकाज होऊ शकलं नाही. पण दिवसअखेर सरकारने माघार घेतल्यामुळे उद्यापासून गदारोळ संपेल अशी चिन्हं आहेत. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात यावे अशी विरोधकांची मागणी होती. पण सरकारचा मतदान घेण्याला विरोध होता. सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे काही पक्ष या दोन मुद्द्यांवर विरोधकांसोबत मतदान करू शकतील, अशी भीती सरकारला होती. पण विरोधक आक्रमक झालेले पाहून सरकारने नमती भूमिका घेतली आणि महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करायला मान्यता दिली. या आठवड्यात राज्यसभेतही महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसह मतदान होणार आहे. पण भ्रष्टाचारावर चर्चा व्हावी ही विरोधकांची मागणी सरकारने मान्य केलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 09:44 AM IST

भ्रष्टाचार - महागाईच्या मुद्यावर संसदेत गदारोळ

02 ऑगस्ट

आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात काहीही कामकाज होऊ शकलं नाही. पण दिवसअखेर सरकारने माघार घेतल्यामुळे उद्यापासून गदारोळ संपेल अशी चिन्हं आहेत. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात यावे अशी विरोधकांची मागणी होती.

पण सरकारचा मतदान घेण्याला विरोध होता. सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे काही पक्ष या दोन मुद्द्यांवर विरोधकांसोबत मतदान करू शकतील, अशी भीती सरकारला होती. पण विरोधक आक्रमक झालेले पाहून सरकारने नमती भूमिका घेतली आणि महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करायला मान्यता दिली. या आठवड्यात राज्यसभेतही महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसह मतदान होणार आहे. पण भ्रष्टाचारावर चर्चा व्हावी ही विरोधकांची मागणी सरकारने मान्य केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close