S M L

कचराकुंडीत दहशतवादी बॉम्ब ठेवण्याची शक्यता

सुधाकर कांबळे, मुंबई 01 ऑगस्ट 13 जुलैच्या बॉम्बस्फोटानंतर पोलीस आता विशेषतः दक्षिण मुंबईत विशेष खबरदारी घेत आहेत. एखाद्या गजबजलेल्या ठिकाणच्या कचरा कुंडीत बॉम्ब ठेवला जाण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे 13 जुलै रोजी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या दक्षिण मंुबईतल्या सुरक्षेचा आढावा आज अतिरिक्त आयुक्त नवल बजाज यांनी घेतला. मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालिकेची काही प्रमाणात मदत घेण्यात येतेय अशी माहिती नवल बजाज यांनी दिली. ज्या भागात स्फोट झालेत ते भाग सतत गजबजलेले असतात. त्यामुळे तिथली सुरक्षा महत्त्वाची आहेच. शिवाय जे भाग व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तिथंही विशेष काळजी घेतली जाते आहे. याठिकाणच्या गर्दीचा फायदा दहशतवादी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी करून घेऊ शकतात. त्यामुळेच इथल्या फेरीवाल्यांमुळेआणखी गर्दी होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. स्थानिक संस्थांची तसेच लोकांचीही या कामात मदत घेतली जात आहे. मुंबईतील झवेरी बाजार आणि ऑपेरा हॉऊस येथे 13 जुलै रोजी बॉम्ब स्फोट झालेत. या बॉम्बस्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण परिक्षेत्र अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज यांनी पुन्हा एकदा या विभागाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दक्षिण मुंबई हा भाग नेहमीचे दहशतवाद्यांचे टार्गेट राहिला आहे. यामुळे हे दहशतवादी कोणत्या रुपात येतील हे सांगता येत नाही. पण ते काय टार्गेट करु शकतात आणि कशा प्रकारे ते आपलं टार्गेट साध्य करु शकतात याची मुंबई पोलीस माहिती घेत आहेत. यापुढे दहशतवादी कचरा कुंडीतही बॉम्ब ठेवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्याचं समजतं.अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज म्हणतात, कचराकुंडीत बाबत काळजी घेण्याच्या सूचना आम्ही पालिकेला केल्या आहेत. जेणे करुन काही व्यक्ति त्या ठिकाणी काही वस्तू ठेवून त्याद्वारे लोकांच्या जीवाचे बरवाईट करु शकतात.ज्या विभागात ब्लास्ट झालेत. ते विभाग सतत गजबजलेले असतात. ते विभाग महत्वाचे तर आहेतचं शिवाय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. तिथे होत असलेल्या गर्दीचा दहशतवादी गैरफायदा, त्याचं ध्येय साध्य करण्यासाठी उपयोग करत असतात. यामुळे त्या विभागात हॉकर्समुळे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. हॉकर्सना हटवण्यासाठी तसेच महत्वाच्या विभागात पोलिसांच अस्तित्व दाखवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. एकाच वेळी 200 पोलीस संवेदनशिल विभागात गस्त घालत असतात.एकणूच काय तर बॉम्ब स्फोटानंतर पोलीस जागे होण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते स्थानिक संस्थांचीही मदत घेत आहेत. तरुणांना मोहिमेत सहभागी करुन घेत आहेत. पुढचे तीन महिने उत्सवाचे आहेत. यावेळी कोणतीही दुर्घटना घडूनसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. एकूणच काय तर बॉम्ब स्फोटानंतर पोलीस जागे होण्याचा प्रयत्न करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 05:15 PM IST

कचराकुंडीत दहशतवादी बॉम्ब ठेवण्याची शक्यता

सुधाकर कांबळे, मुंबई

01 ऑगस्ट

13 जुलैच्या बॉम्बस्फोटानंतर पोलीस आता विशेषतः दक्षिण मुंबईत विशेष खबरदारी घेत आहेत. एखाद्या गजबजलेल्या ठिकाणच्या कचरा कुंडीत बॉम्ब ठेवला जाण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे 13 जुलै रोजी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या दक्षिण मंुबईतल्या सुरक्षेचा आढावा आज अतिरिक्त आयुक्त नवल बजाज यांनी घेतला.

मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालिकेची काही प्रमाणात मदत घेण्यात येतेय अशी माहिती नवल बजाज यांनी दिली. ज्या भागात स्फोट झालेत ते भाग सतत गजबजलेले असतात. त्यामुळे तिथली सुरक्षा महत्त्वाची आहेच. शिवाय जे भाग व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तिथंही विशेष काळजी घेतली जाते आहे.

याठिकाणच्या गर्दीचा फायदा दहशतवादी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी करून घेऊ शकतात. त्यामुळेच इथल्या फेरीवाल्यांमुळेआणखी गर्दी होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. स्थानिक संस्थांची तसेच लोकांचीही या कामात मदत घेतली जात आहे.

मुंबईतील झवेरी बाजार आणि ऑपेरा हॉऊस येथे 13 जुलै रोजी बॉम्ब स्फोट झालेत. या बॉम्बस्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण परिक्षेत्र अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज यांनी पुन्हा एकदा या विभागाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दक्षिण मुंबई हा भाग नेहमीचे दहशतवाद्यांचे टार्गेट राहिला आहे.

यामुळे हे दहशतवादी कोणत्या रुपात येतील हे सांगता येत नाही. पण ते काय टार्गेट करु शकतात आणि कशा प्रकारे ते आपलं टार्गेट साध्य करु शकतात याची मुंबई पोलीस माहिती घेत आहेत. यापुढे दहशतवादी कचरा कुंडीतही बॉम्ब ठेवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्याचं समजतं.

अतिरिक्त पोलीस आयुक्त नवल बजाज म्हणतात, कचराकुंडीत बाबत काळजी घेण्याच्या सूचना आम्ही पालिकेला केल्या आहेत. जेणे करुन काही व्यक्ति त्या ठिकाणी काही वस्तू ठेवून त्याद्वारे लोकांच्या जीवाचे बरवाईट करु शकतात.

ज्या विभागात ब्लास्ट झालेत. ते विभाग सतत गजबजलेले असतात. ते विभाग महत्वाचे तर आहेतचं शिवाय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. तिथे होत असलेल्या गर्दीचा दहशतवादी गैरफायदा, त्याचं ध्येय साध्य करण्यासाठी उपयोग करत असतात.

यामुळे त्या विभागात हॉकर्समुळे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. हॉकर्सना हटवण्यासाठी तसेच महत्वाच्या विभागात पोलिसांच अस्तित्व दाखवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. एकाच वेळी 200 पोलीस संवेदनशिल विभागात गस्त घालत असतात.

एकणूच काय तर बॉम्ब स्फोटानंतर पोलीस जागे होण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते स्थानिक संस्थांचीही मदत घेत आहेत. तरुणांना मोहिमेत सहभागी करुन घेत आहेत. पुढचे तीन महिने उत्सवाचे आहेत. यावेळी कोणतीही दुर्घटना घडूनसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. एकूणच काय तर बॉम्ब स्फोटानंतर पोलीस जागे होण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close