S M L

पाम बिच रोडवरील अनधिकृत बांधकामांना ग्रीन सिग्नल मिळण्याचे संकेत

02 ऑगस्टनवी मुंबईतील पामबिच रोडवरील 23 पैकी 21 टोले जंग टॉवर्सनी अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळून आलं आहे. तरीसुद्धा बहुतेक बांधकामं नियमित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेत. 21 टॉवर्सनी अनधिकृतपणे 3 ते साडेतीन मजल्याचे अवैध बांधकाम केल्याचे सिद्ध झालंय. त्यांना नवी मंुबई महापालिकेने 18 मार्च 2011 ला नोटिसा बजावल्या आहेत. तसेच विनस कॉ.ऑपरेटिव्ह सोसायटीला काम बंद करण्याची नोटिस बजावण्यात आली. या प्रकरणी आधीच सीआयडी चौकशी सुरु आहे. तसेच नोटिसांची मुदत संपल्यामुळे आवश्यक तिथे कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पण, त्याच वेळी 5 टॉवर्सनी बांधकाम नियमित करण्यासाठी सरकारकडे अर्ज केलेत. त्यांच्या अर्जांवरही एमआरटीपी कायद्याअंतर्गत विचार केला जाईल अस म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे पाम बिच रोडवरील बांधकाम नियमित करण्याचे संकेत दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 10:11 AM IST

पाम बिच रोडवरील अनधिकृत बांधकामांना ग्रीन सिग्नल मिळण्याचे संकेत

02 ऑगस्ट

नवी मुंबईतील पामबिच रोडवरील 23 पैकी 21 टोले जंग टॉवर्सनी अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळून आलं आहे. तरीसुद्धा बहुतेक बांधकामं नियमित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेत. 21 टॉवर्सनी अनधिकृतपणे 3 ते साडेतीन मजल्याचे अवैध बांधकाम केल्याचे सिद्ध झालंय. त्यांना नवी मंुबई महापालिकेने 18 मार्च 2011 ला नोटिसा बजावल्या आहेत.

तसेच विनस कॉ.ऑपरेटिव्ह सोसायटीला काम बंद करण्याची नोटिस बजावण्यात आली. या प्रकरणी आधीच सीआयडी चौकशी सुरु आहे. तसेच नोटिसांची मुदत संपल्यामुळे आवश्यक तिथे कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

पण, त्याच वेळी 5 टॉवर्सनी बांधकाम नियमित करण्यासाठी सरकारकडे अर्ज केलेत. त्यांच्या अर्जांवरही एमआरटीपी कायद्याअंतर्गत विचार केला जाईल अस म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे पाम बिच रोडवरील बांधकाम नियमित करण्याचे संकेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close