S M L

वाशिममध्ये 24 बोगस नसबंदी

02 ऑगस्टवाशिम जिल्ह्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार घडला.येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तब्बल 24 बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले. नांदगाव इथं राहणारे रामेश्वर ठाकरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मागितली. तेव्हा ही बाब उघड झाली. यादीत लिहिलेल्या नावांची व्यक्ती गावातच नसल्याचा पुरावाही त्यांनी ग्रामपंचायतीतून दिला. दरम्यान, या आरोग्य केंद्रात अशा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला. मात्र ह्या प्रकरणात सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप गावकरी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 08:14 AM IST

वाशिममध्ये 24 बोगस नसबंदी

02 ऑगस्ट

वाशिम जिल्ह्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार घडला.येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तब्बल 24 बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले. नांदगाव इथं राहणारे रामेश्वर ठाकरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मागितली. तेव्हा ही बाब उघड झाली.

यादीत लिहिलेल्या नावांची व्यक्ती गावातच नसल्याचा पुरावाही त्यांनी ग्रामपंचायतीतून दिला. दरम्यान, या आरोग्य केंद्रात अशा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला. मात्र ह्या प्रकरणात सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप गावकरी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 08:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close