S M L

नवी मुंबईत डेंग्यूचा आणखी एक बळी

02 ऑगस्टनवी मुंबई मध्ये डेंग्यूचा पुन्हा एक बळी गेला आहे. महेश केशरवानी 20 वर्षाच्या तरुणाचा डेंग्युनं बळी गेला. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने मृत्यूच्या दाखल्यातून डेंग्यू मिटवण्यासाठी भोंगळ कारभार दिसून आला. लक्षद्वीप या वाशीच्या रुग्णालयात महेशचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूचा दाखला देतांना त्यामध्ये खाडाखोड करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. नेरुळ सेक्टर - 10 मध्ये राहणार्‍या महेशची तब्येत बिघडल्याने त्याला 4 दिवसांपूर्वी स्थानिक सुयश दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताच्या टेस्ट करण्यात आल्या. महेशच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी महेशला याच हॉस्पिटल मध्ये ठेवले. 1 ऑग्सट रोजी महेशचा दवाखान्यातच मृत्यू झाला. आधी मृत्यू हा डेंग्यूने झाल्याचा दाखला महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला. डेंग्यू पॉझिटिव्ह अस स्पष्टपणे त्याच्या केसपेपरवरही लिहण्यात आले. पण महेशच्या केसपेपरवरचे डेग्यू पॉझिटिव्ह व्हायटरने मिटवण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी ही खाडाखोड डेंग्यू लपवण्यासाठी केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 05:52 PM IST

नवी मुंबईत डेंग्यूचा आणखी एक बळी

02 ऑगस्ट

नवी मुंबई मध्ये डेंग्यूचा पुन्हा एक बळी गेला आहे. महेश केशरवानी 20 वर्षाच्या तरुणाचा डेंग्युनं बळी गेला. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने मृत्यूच्या दाखल्यातून डेंग्यू मिटवण्यासाठी भोंगळ कारभार दिसून आला. लक्षद्वीप या वाशीच्या रुग्णालयात महेशचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूचा दाखला देतांना त्यामध्ये खाडाखोड करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

नेरुळ सेक्टर - 10 मध्ये राहणार्‍या महेशची तब्येत बिघडल्याने त्याला 4 दिवसांपूर्वी स्थानिक सुयश दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताच्या टेस्ट करण्यात आल्या. महेशच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी महेशला याच हॉस्पिटल मध्ये ठेवले. 1 ऑग्सट रोजी महेशचा दवाखान्यातच मृत्यू झाला.

आधी मृत्यू हा डेंग्यूने झाल्याचा दाखला महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला. डेंग्यू पॉझिटिव्ह अस स्पष्टपणे त्याच्या केसपेपरवरही लिहण्यात आले. पण महेशच्या केसपेपरवरचे डेग्यू पॉझिटिव्ह व्हायटरने मिटवण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी ही खाडाखोड डेंग्यू लपवण्यासाठी केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close