S M L

कॉमनवेल्थचं भूत पुन्हा युपीएच्या मानगुटीवर

02 ऑगस्टकॉमनवेल्थ घोटाळ्याचं भूत आता पुन्हा युपीए सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे. कॅगने आपल्या अहवालात पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवला आहे. पण आज केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी पंतप्रधानांचा बचाव केला आणि भाजपवरच उलटे आरोप केले. तर आज या अहवालातली आणखी माहिती आपल्या हाती लागली. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सरकारी तिजोरीचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे. असं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. आता शीला दीक्षित राजीनामा देतील का हा खरा प्रश्न आहे. संसदेच्या गोंधळात अनपेक्षितपणे क्रीडा मंत्री अजय माकन उभे राहिले. आणि संसदेत सादरही न झालेल्या सीएजी अहवालावर स्पष्टीकरण देऊ लागले. कॉमनवेल्थ खेळाबाबतचा हा अहवाल काल आयबीएन लोकमतने दाखवला. यात कलमाडींच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान कार्यालयाला दोषी धरण्यात आलंय. तसेच कलमाडींविरुद्ध वारंवार तक्रारी मिळूनही पंतप्रधान कार्यालयाने त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे अहवालात म्हटलंय. त्यामुळे विरोधक आक्रमक झालेले पाहून माकन यांनी स्पष्टीकरण देत पंतप्रधानांचा बचाव केला. एनडीए सरकारनेच कलमाडींची नियुक्ती केली हा अजय माकन यांचा आरोप आहे. वाजपेयी सरकारमध्ये क्रीडामंत्री असलेल्या विक्रम वर्मा यांनी खोडून काढला. पण आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या सीएजी अहवालात अनेक धक्कादायक बाबी आहेत. सुरेश कलमाडी आणि पंतप्रधान कार्यालयासोबतच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर अनेक गंभीर ठपके ठेवण्यात आलेत. कॉमनवेल्थ घोटाळा - आता शीला दीक्षित यांच्यावर ठपका ! - पथदिव्यांच्या व्यवहारांत रू 31 कोटींचं नुकसान- रू 15 हजार किमतींचे दिवे रू 32 हजारांना विकत घेतले- सार्वजनिक बांधकाम विभागाने अपात्र ठरवलेल्या 'स्पेसएज' कंपनीची शीला दीक्षितांनी बाजू घेतली- कंत्राट मिळाल्यानंतर 'स्पेसएज'ने रू 5 हजारांचे दिवे प्रत्येकी रू 25 हजारांना विकले आणि रू 2.68 कोटींचा नफा कमावला- शीला दीक्षितांच्या परवानगीने 60 लाख रोपटी (कुंड्यासोबत) रू 24 कोटींना विकत घेण्यात आली- खेळ संपल्यानंतर या कुंड्या या सरकारी कार्यालयात पाठवण्यात येणार होत्या, पण त्या तिथे आढळल्या नाहीतसुरेश कलमाडी हे कॉमनवेल्थ खेळांदरम्या झालेल्या टायमर घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत आहेत. पण शुंगलू समितीने ठपका ठेवल्यानंतरही दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना कुणी हात लावू शकलं नाही. खेळादरम्यान, दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणण्यासाठी दिल्ली सरकार, महानगर पालिका, दिल्ली विकास प्राधिकरण यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. सीएजी अहवालाच्या निमित्ताने आता हा तपास कलमाडींपलिकडेही जाऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 04:16 PM IST

कॉमनवेल्थचं भूत पुन्हा युपीएच्या मानगुटीवर

02 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्याचं भूत आता पुन्हा युपीए सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे. कॅगने आपल्या अहवालात पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवला आहे. पण आज केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी पंतप्रधानांचा बचाव केला आणि भाजपवरच उलटे आरोप केले. तर आज या अहवालातली आणखी माहिती आपल्या हाती लागली.

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सरकारी तिजोरीचं कोट्यवधींचं नुकसान झाले आहे. असं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. आता शीला दीक्षित राजीनामा देतील का हा खरा प्रश्न आहे.

संसदेच्या गोंधळात अनपेक्षितपणे क्रीडा मंत्री अजय माकन उभे राहिले. आणि संसदेत सादरही न झालेल्या सीएजी अहवालावर स्पष्टीकरण देऊ लागले. कॉमनवेल्थ खेळाबाबतचा हा अहवाल काल आयबीएन लोकमतने दाखवला.

यात कलमाडींच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान कार्यालयाला दोषी धरण्यात आलंय. तसेच कलमाडींविरुद्ध वारंवार तक्रारी मिळूनही पंतप्रधान कार्यालयाने त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे अहवालात म्हटलंय. त्यामुळे विरोधक आक्रमक झालेले पाहून माकन यांनी स्पष्टीकरण देत पंतप्रधानांचा बचाव केला.

एनडीए सरकारनेच कलमाडींची नियुक्ती केली हा अजय माकन यांचा आरोप आहे. वाजपेयी सरकारमध्ये क्रीडामंत्री असलेल्या विक्रम वर्मा यांनी खोडून काढला. पण आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या सीएजी अहवालात अनेक धक्कादायक बाबी आहेत. सुरेश कलमाडी आणि पंतप्रधान कार्यालयासोबतच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर अनेक गंभीर ठपके ठेवण्यात आलेत.

कॉमनवेल्थ घोटाळा - आता शीला दीक्षित यांच्यावर ठपका !

- पथदिव्यांच्या व्यवहारांत रू 31 कोटींचं नुकसान- रू 15 हजार किमतींचे दिवे रू 32 हजारांना विकत घेतले- सार्वजनिक बांधकाम विभागाने अपात्र ठरवलेल्या 'स्पेसएज' कंपनीची शीला दीक्षितांनी बाजू घेतली- कंत्राट मिळाल्यानंतर 'स्पेसएज'ने रू 5 हजारांचे दिवे प्रत्येकी रू 25 हजारांना विकले आणि रू 2.68 कोटींचा नफा कमावला- शीला दीक्षितांच्या परवानगीने 60 लाख रोपटी (कुंड्यासोबत) रू 24 कोटींना विकत घेण्यात आली- खेळ संपल्यानंतर या कुंड्या या सरकारी कार्यालयात पाठवण्यात येणार होत्या, पण त्या तिथे आढळल्या नाहीत

सुरेश कलमाडी हे कॉमनवेल्थ खेळांदरम्या झालेल्या टायमर घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत आहेत. पण शुंगलू समितीने ठपका ठेवल्यानंतरही दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना कुणी हात लावू शकलं नाही.

खेळादरम्यान, दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणण्यासाठी दिल्ली सरकार, महानगर पालिका, दिल्ली विकास प्राधिकरण यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. सीएजी अहवालाच्या निमित्ताने आता हा तपास कलमाडींपलिकडेही जाऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close