S M L

येडियुरप्पांचे बंड सुरूच

02 ऑगस्टकर्नाटकातील राजकीय नाटक अजूनही सुरूच आहे. पायउतार झालेले येडियुरप्पा हार मानायला तयार नाही. आज येडियुरप्पांनी लोकायुक्तांचा अहवालाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. तसेच या अहवालावर पुनर्विचार करावा अशी याचिका लोकायुक्तांकडे केली. आपल्या समर्थक 60 आमदारांना त्यांनी एका हॉटेलात थांबवले. सदानंद गौडा यांनाच मुख्यमंत्री करा ही त्यांची मागणी हायकमांडला मंजूर नाही. उद्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावे अशी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची इच्छा आहे. पण याला येडियुरप्पांचा कडवा विरोध आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कर्नाटक भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान, 6 महिन्यांच्या आत आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा दावा येडियुरप्पा यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 04:51 PM IST

येडियुरप्पांचे बंड सुरूच

02 ऑगस्ट

कर्नाटकातील राजकीय नाटक अजूनही सुरूच आहे. पायउतार झालेले येडियुरप्पा हार मानायला तयार नाही. आज येडियुरप्पांनी लोकायुक्तांचा अहवालाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. तसेच या अहवालावर पुनर्विचार करावा अशी याचिका लोकायुक्तांकडे केली. आपल्या समर्थक 60 आमदारांना त्यांनी एका हॉटेलात थांबवले.

सदानंद गौडा यांनाच मुख्यमंत्री करा ही त्यांची मागणी हायकमांडला मंजूर नाही. उद्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावे अशी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची इच्छा आहे. पण याला येडियुरप्पांचा कडवा विरोध आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कर्नाटक भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान, 6 महिन्यांच्या आत आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा दावा येडियुरप्पा यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close