S M L

मुंबईतील नालेसफाईची सीआयडी चौकशी होणार

03 ऑगस्टमुंबईतील नालेसफाईचा मुद्दा विधानसभेत गाजला. मुंबईतील नालेसफाईची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. मुंबईमध्ये मुद्दाम कचर्‍याचे ढिग उभे करुन सफाईचे टेंडर काढले जातात असा टोला जाधव यांनी शिवसेनेला मारला. तर मिठी नदी सफाई कंत्राट प्रकरणी पालिकेचं टेंडर हे एमएमआरडीएच्या टेंडरपेक्षा 145 टक्के जास्त असल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. नालेसफाईवरील लक्ष्यवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. नालेसफाईच्या सीआयडी चौकशीमध्ये जे कंत्राटदार दोषी आढळतील त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 12:31 PM IST

मुंबईतील नालेसफाईची सीआयडी चौकशी होणार

03 ऑगस्ट

मुंबईतील नालेसफाईचा मुद्दा विधानसभेत गाजला. मुंबईतील नालेसफाईची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. मुंबईमध्ये मुद्दाम कचर्‍याचे ढिग उभे करुन सफाईचे टेंडर काढले जातात असा टोला जाधव यांनी शिवसेनेला मारला.

तर मिठी नदी सफाई कंत्राट प्रकरणी पालिकेचं टेंडर हे एमएमआरडीएच्या टेंडरपेक्षा 145 टक्के जास्त असल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. नालेसफाईवरील लक्ष्यवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. नालेसफाईच्या सीआयडी चौकशीमध्ये जे कंत्राटदार दोषी आढळतील त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close