S M L

पुण्यात बुरूड आळीमध्ये लागलेल्या आगीचा अर्धवट अहवाल

02 ऑगस्टपुणेकरांच्या सुरक्षेबाबत महापालिकेचे अधिकारीच गंभीर नसल्याचं आता स्पष्ट होतं. कारण पुणे बुरुड आळीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रकणाराचा अर्धवट अहवाल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या अहवालामध्ये अग्निशमन अधिकारी रणपीसेच दोषी असल्याचे अहवालाच्या पहिल्या भागामध्ये स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे पुन्हा याच अहवालात प्रमुख अधिकार्‍यांना क्लिन चीट देऊन टाकली. त्यामुळे आयुक्तांच्या पातळीवर हा अहवाल पुन्हा बनवला जावा असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोक मृत्युमुखी पडले होते.अग्निशमन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार झाला असल्याचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता. यामध्ये अग्निशमन दलाकडे पुरेशा सर्च लाईट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच या सर्चलाईट डिस्चार्जही झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अग्नीशमन दलाकडे अग्नीरोधक गणवेश असतानाही हा गणवेश वापरला गेला नाही असंही या अहवालात नमुद करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2011 10:42 AM IST

पुण्यात बुरूड आळीमध्ये लागलेल्या आगीचा अर्धवट अहवाल

02 ऑगस्ट

पुणेकरांच्या सुरक्षेबाबत महापालिकेचे अधिकारीच गंभीर नसल्याचं आता स्पष्ट होतं. कारण पुणे बुरुड आळीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रकणाराचा अर्धवट अहवाल दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

या अहवालामध्ये अग्निशमन अधिकारी रणपीसेच दोषी असल्याचे अहवालाच्या पहिल्या भागामध्ये स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे पुन्हा याच अहवालात प्रमुख अधिकार्‍यांना क्लिन चीट देऊन टाकली. त्यामुळे आयुक्तांच्या पातळीवर हा अहवाल पुन्हा बनवला जावा असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोक मृत्युमुखी पडले होते.अग्निशमन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार झाला असल्याचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता.

यामध्ये अग्निशमन दलाकडे पुरेशा सर्च लाईट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच या सर्चलाईट डिस्चार्जही झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अग्नीशमन दलाकडे अग्नीरोधक गणवेश असतानाही हा गणवेश वापरला गेला नाही असंही या अहवालात नमुद करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2011 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close