S M L

अधिकार्‍यांच्या बदल्यासाठी मनसेचे आंदोलन

03 ऑगस्टकोल्हापूर परिवहन विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्या तत्काळ कराव्यात या मागणीसाठी आज मनसेनं आंदोलन केलं. कोल्हापूर परिवहन विभागात अनेक कर्मचारी आणि अधिकारी गेल्या 15 वर्षापासून सेवेत आहेत. या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियमाप्रमाणे बदल्या होणे आवश्यक असतानाही बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आज मनसेनं हे आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून परिवहन विभागाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून अटक केली. परिवहन विभागाने तत्काळ 15-15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकारांच्या बदल्या केल्या नाहीत तर कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 12:42 PM IST

अधिकार्‍यांच्या बदल्यासाठी मनसेचे आंदोलन

03 ऑगस्ट

कोल्हापूर परिवहन विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्या तत्काळ कराव्यात या मागणीसाठी आज मनसेनं आंदोलन केलं. कोल्हापूर परिवहन विभागात अनेक कर्मचारी आणि अधिकारी गेल्या 15 वर्षापासून सेवेत आहेत. या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियमाप्रमाणे बदल्या होणे आवश्यक असतानाही बदल्या करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे आज मनसेनं हे आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून परिवहन विभागाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून अटक केली. परिवहन विभागाने तत्काळ 15-15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकारांच्या बदल्या केल्या नाहीत तर कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close