S M L

गुजरात विकासाचा 'राज' अभ्यास !

03 ऑगस्टमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुजरात दौर्‍याला आजपासून सुरूवात झाली. गुजरातमध्ये कोणकोणती विकासकामं झाली आणि ती कशी करण्यात आली याचा अभ्यास ते या दौर्‍यात करणार आहेत. महाराष्ट्राबाहेर पडताच राज ठाकरे यांनी आज चक्क हिंदीतून पत्रकारांशी बातचीत केली. आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत. अशावेळी सर्वांनाच आपलं म्हणणं कळायला हवे यासाठी आपण हिंदीतून संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे 9 दिवस गुजरातच्या दौर्‍यावर आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करुन सुरुवात राज ठाकरेंच्या दौर्‍याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करुन झाली. राज ठाकरेंनी सर्वात आधी साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथं चालणार्‍या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. सूतकताई बरोबर इतरही कामांची पाहणी केली. यानंतर राज ठाकरेंनी गुजरातमध्ये झालेल्या विकासकामांचा एक धावता आढावा घेतला. गुजरात सरकारच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांना गुजरातच्या विकासाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. अधिकार्‍यांकडून त्यांनी या कामांची सविस्तर माहिती घेतली.मोदींना शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मानपत्र भेटप्रशासकीय अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना खास भेटही दिली. त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मानपत्र भेट म्हणून दिलं. स्वत:च्या राज्याच्या विकासासाठी दुसर्‍या राज्यात जाऊन तिथल्या विकासकामांचा अभ्यास करणार्‍या राज ठाकरेंची मोदींनीही भरभरुन स्तुती केली. आणि राज ठाकरे आपले विशेष पाहुणे असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या दौर्‍यासाठी गुजरात सरकार सर्व ती मदत करेल असं आश्वासनही मोदींनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 05:52 PM IST

गुजरात विकासाचा 'राज' अभ्यास !

03 ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुजरात दौर्‍याला आजपासून सुरूवात झाली. गुजरातमध्ये कोणकोणती विकासकामं झाली आणि ती कशी करण्यात आली याचा अभ्यास ते या दौर्‍यात करणार आहेत. महाराष्ट्राबाहेर पडताच राज ठाकरे यांनी आज चक्क हिंदीतून पत्रकारांशी बातचीत केली. आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत. अशावेळी सर्वांनाच आपलं म्हणणं कळायला हवे यासाठी आपण हिंदीतून संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे 9 दिवस गुजरातच्या दौर्‍यावर आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करुन सुरुवात

राज ठाकरेंच्या दौर्‍याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करुन झाली. राज ठाकरेंनी सर्वात आधी साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथं चालणार्‍या उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. सूतकताई बरोबर इतरही कामांची पाहणी केली. यानंतर राज ठाकरेंनी गुजरातमध्ये झालेल्या विकासकामांचा एक धावता आढावा घेतला. गुजरात सरकारच्या प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांना गुजरातच्या विकासाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. अधिकार्‍यांकडून त्यांनी या कामांची सविस्तर माहिती घेतली.

मोदींना शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मानपत्र भेट

प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना खास भेटही दिली. त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मानपत्र भेट म्हणून दिलं. स्वत:च्या राज्याच्या विकासासाठी दुसर्‍या राज्यात जाऊन तिथल्या विकासकामांचा अभ्यास करणार्‍या राज ठाकरेंची मोदींनीही भरभरुन स्तुती केली. आणि राज ठाकरे आपले विशेष पाहुणे असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या दौर्‍यासाठी गुजरात सरकार सर्व ती मदत करेल असं आश्वासनही मोदींनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close