S M L

इंडोनेशियन जहाज रॅकला अखेर जलसमाधी ; खलाशी सुखरुप

4 ऑगस्ट, मुंबईमुंबईच्या समुद्रात अडकलेल्या मालवाहू जहाजाला अखेर जलसमाधी मिळाली. मुंबई समुद्रकिना-यापासून फक्त 30 नॉटिकल मैलावर हे जहाज अडकलं होतं. एमव्ही रॅक असं या मालवाहू जहाजाचं नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमाराला हे जहाज बुडालं. जहाजावर 60 हजार मेट्रिक टन कोळसा होता. इंडोनेशियाहून गुजरातला हे जहाज येत होतं. या जहाजावरील क्रू मेंबर्सनी मदतीसाठी विनंती करताच कोस्ट गार्डचं INS प्रहरी हे जहाज मदतीसाठी रवाना झालं. आणि जहाजावरील सर्व 30 कर्मचा•यांना वाचवण्यात वाचवण्यात भारतीय नौदलाच्या जहाजाला यश आलंय. पण जहाजावरच्या तेलामुळे समुद्र पर्यावरणाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे मुंबई समुद्र किना-यावरच्या मँग्रोव्हजलाही धोका आहे. मरीन तज्ज्ञांनी हा धोक्याचा इशारा दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2011 11:46 AM IST

इंडोनेशियन जहाज रॅकला अखेर जलसमाधी ; खलाशी सुखरुप

4 ऑगस्ट, मुंबई

मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या मालवाहू जहाजाला अखेर जलसमाधी मिळाली. मुंबई समुद्रकिना-यापासून फक्त 30 नॉटिकल मैलावर हे जहाज अडकलं होतं. एमव्ही रॅक असं या मालवाहू जहाजाचं नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमाराला हे जहाज बुडालं. जहाजावर 60 हजार मेट्रिक टन कोळसा होता. इंडोनेशियाहून गुजरातला हे जहाज येत होतं. या जहाजावरील क्रू मेंबर्सनी मदतीसाठी विनंती करताच कोस्ट गार्डचं INS प्रहरी हे जहाज मदतीसाठी रवाना झालं. आणि जहाजावरील सर्व 30 कर्मचा•यांना वाचवण्यात वाचवण्यात भारतीय नौदलाच्या जहाजाला यश आलंय. पण जहाजावरच्या तेलामुळे समुद्र पर्यावरणाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे मुंबई समुद्र किना-यावरच्या मँग्रोव्हजलाही धोका आहे. मरीन तज्ज्ञांनी हा धोक्याचा इशारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close