S M L

कॅगचा अहवाल सादर ; पंतप्रधान कार्यालयालावर ठपका

05 ऑगस्टकॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करणार्‍या निरीक्षण केंद्रीय लेखापरीक्षणाचा (कॅग) अहवाल आज लोकसभेत सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये सुरेश कलमाडी यांच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीबद्दल पंतप्रधान कार्यालयाला दोष देण्यात आला. पण हा रिपोर्ट सादर झाल्यानंतर भाजपने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. मनमोहन सिंग हे सोनिया गांधींच्या सांगण्यानुसारच वागत असल्याचा आरोप भाजपचे खासदार बलवीर पुंज यांनी केला. तर कॉमनवेल्थ घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवण्यात आला. या अहवालाचा तपशील आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला.कॅगचा ठपका1. सुरेश कलमाडी यांची 'कॉमनवेल्थ'च्या प्रमुखपदी नेमणूकीबद्दल पंतप्रधान कार्यालयाला दोष2. पंतप्रधान कार्यालयाने कलमाडींविरुद्ध आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले 3. मणिशंकर अय्यर आणि सुनील दत्त यांनी केल्या होत्या कलमाडींविरुद्ध तक्रारी 5. कलमाडींनी जाणीवपूर्वक काम करण्यात दिरंगाई करून खर्चात वाढ केली शीला दीक्षित यांच्यावर ताशेरे1. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी वाढत्या खर्चाविरोधात पावलं उचलली नाहीत 2. दिल्ली सरकारच्या संस्थांनी सुशोभीकरणासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च केला.3. पथदिव्यांच्या व्यवहारात 31 कोटींचं नुकसान 4. 15 हजार रु. किमतीचे दिवे 32 हजारांना विकत घेतले 5. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपात्र ठरवलेल्या 'स्पेसएज' कंपनीची शीला दीक्षितांनी बाजू घेतली6. कंत्राट मिळाल्यानंतर 'स्पेसएज'ने रू 5 हजारांचे दिवे प्रत्येकी रू 25 हजारांना विकले7. 2.68 रु. कोटींचा नफा कमावला8. शीला दीक्षितांच्या परवानगीने 60 लाख रोपट्यांची 24 कोटींना खरेदी 8. खेळ संपल्यानंतर या कुंड्या सरकारी कार्यालयात पाठवण्यात आल्या नाहीत 9. नवीन बसेसची खरेदी आणि बॅसस्टॉप उभारणीत घोटाळा10. 1000 बसस्टॉप बांधण्यासाठी एका कंपनीला 96.7 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट11. खेळांपर्यंत यातले फक्त 125 बसस्टॉप तयार

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2011 11:00 AM IST

कॅगचा अहवाल सादर ; पंतप्रधान कार्यालयालावर ठपका

05 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करणार्‍या निरीक्षण केंद्रीय लेखापरीक्षणाचा (कॅग) अहवाल आज लोकसभेत सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये सुरेश कलमाडी यांच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीबद्दल पंतप्रधान कार्यालयाला दोष देण्यात आला. पण हा रिपोर्ट सादर झाल्यानंतर भाजपने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

मनमोहन सिंग हे सोनिया गांधींच्या सांगण्यानुसारच वागत असल्याचा आरोप भाजपचे खासदार बलवीर पुंज यांनी केला. तर कॉमनवेल्थ घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवण्यात आला. या अहवालाचा तपशील आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला.

कॅगचा ठपका1. सुरेश कलमाडी यांची 'कॉमनवेल्थ'च्या प्रमुखपदी नेमणूकीबद्दल पंतप्रधान कार्यालयाला दोष2. पंतप्रधान कार्यालयाने कलमाडींविरुद्ध आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले 3. मणिशंकर अय्यर आणि सुनील दत्त यांनी केल्या होत्या कलमाडींविरुद्ध तक्रारी 5. कलमाडींनी जाणीवपूर्वक काम करण्यात दिरंगाई करून खर्चात वाढ केली

शीला दीक्षित यांच्यावर ताशेरे1. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी वाढत्या खर्चाविरोधात पावलं उचलली नाहीत 2. दिल्ली सरकारच्या संस्थांनी सुशोभीकरणासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च केला.3. पथदिव्यांच्या व्यवहारात 31 कोटींचं नुकसान 4. 15 हजार रु. किमतीचे दिवे 32 हजारांना विकत घेतले 5. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपात्र ठरवलेल्या 'स्पेसएज' कंपनीची शीला दीक्षितांनी बाजू घेतली6. कंत्राट मिळाल्यानंतर 'स्पेसएज'ने रू 5 हजारांचे दिवे प्रत्येकी रू 25 हजारांना विकले7. 2.68 रु. कोटींचा नफा कमावला8. शीला दीक्षितांच्या परवानगीने 60 लाख रोपट्यांची 24 कोटींना खरेदी 8. खेळ संपल्यानंतर या कुंड्या सरकारी कार्यालयात पाठवण्यात आल्या नाहीत 9. नवीन बसेसची खरेदी आणि बॅसस्टॉप उभारणीत घोटाळा10. 1000 बसस्टॉप बांधण्यासाठी एका कंपनीला 96.7 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट11. खेळांपर्यंत यातले फक्त 125 बसस्टॉप तयार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close